Parbhani : घरासमोर अ‍ॅटो, मोटारसायकल लंपास

2 hours ago 3

परभणी(Parbhani) :- नानलपेठ पोलीस ठाणे हद्दित चोरीच्या दोन घटनांची नोंद झाली आहे. घरासमोरुन एकाचा अ‍ॅटो लंपास करण्यात आला तर दुसर्‍या घटनेत शासकीय रुग्णालय परिसरातून दुचाकी चोरीला गेली आहे.

नानलपेठ पोलिसात दोन गुन्ह्यांची नोंद

सुभाष सोनवणे यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादीने काद्राबाद प्लॉट येथील आपल्या घरासमोर एम.एच. २२ ए.पी. ३७६४ या क्रमांकाचा अ‍ॅटो उभा केला होता. सदर अ‍ॅटो अज्ञाताने लंपास केला. शोध घेऊनही वाहन न मिळाल्याने १ ऑक्टोबर रोजी अज्ञात चोरट्या विरुध्द नानलपेठ पोलिसात तक्रार देण्यात आली. तपास सपोउपनि. राठोड करत आहेत. दुसरी घटना जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात घडली. या ठिकाणी सय्यद रहिम यांची एम.एच. २२ ए.एफ. ४८२२ या क्रमांकाची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली. शोध घेऊनही वाहन न मिळून आल्याने नानलपेठ पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. तपास सपोउपनि. राठोड करत आहेत. मागील काही दिवसात वाहन चोरीला (Robbery) जाण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article