मुख्यमंत्री कोणाचा? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित, राज्याच्या राजकारणात काय घडणार?

2 hours ago 1

राज्यात महायुतीची सत्ता येणार हे निश्चित झाले आहे. आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. त्यातच आता नुकतंच मुख्यमंत्रि‍पदाचा फॉर्म्युला समोर आला आहे.

मुख्यमंत्री कोणाचा? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित, राज्याच्या राजकारणात काय घडणार?

देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवारImage Credit source: Instagram

| Updated on: Nov 25, 2024 | 9:07 AM

Maharashtra Election 2024 Result : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत झाली होती. या लढतीत महायुतीला एकमत मिळाले तर महाविकासआघाडीचा सुपडासाफ केला आहे. महायुतीने 230 जागांवर विजय मिळवला. यात भाजप 132 जागा, शिवसेना शिंदे गट 57 आणि राष्ट्रवादी अजित पवार गट 41 जागांवर आघाडीवर आहेत. तर महाविकासआघाडीला फक्त 46 जागांवर समाधान मानावे लागले आहे. यात काँग्रेस 16 जागा, ठाकरे गट 20 जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार गट 10 जागा मिळाल्या. तर अपक्ष-इतर यांना 12 जागा मिळाल्या आहेत. यामुळे राज्यात महायुतीची सत्ता येणार हे निश्चित झाले आहे. आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. त्यातच आता नुकतंच मुख्यमंत्रि‍पदाचा फॉर्म्युला समोर आला आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला निर्विवाद यश मिळाले आहे. यामुळे मुख्यमंत्रि‍पदी कोणाची निवड होणार याबद्दल सर्वांना उत्सुकता लागली आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण याबद्दल महायुतीकडून काहीही स्पष्ट करण्यात आले नव्हते. आता नुकतंच मुख्यमंत्रि‍पदाचा फॉर्म्युला समोर आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्रि‍पदासाठी दोन फॉर्म्युला निश्चित करण्यात आले आहेत.

मुख्यमंत्रिपदाच्या 2 फॉर्मुल्यावर महायुतीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. या चर्चेत मुख्यमंत्रिपदासाठी अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युलासाठी शिंदे गट आग्रही असल्याचे पाहायला मिळत आहे. यातील पहिला फॉर्म्युलामध्ये अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद भाजपकडे असेल. तर त्यानंतरचे अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद हे शिंदे गटाकडे असेल. तसेच मुख्यमंत्रि‍पदासाठी 2-2-1 अशा फॉर्म्युलावरही चर्चा सुरु आहे. या फॉर्म्युलानुसार भाजपकडे दोन वर्षे, शिंदे गटाकडे दोन वर्षे आणि अजित पवारांकडे एक वर्ष मुख्यमंत्रिपद दिले जाईल. या फॉर्म्युलासाठी अजित पवार गट हा प्रचंड आग्रही आहे. आता या फॉर्म्युलावर चर्चा करण्यासाठी महायुतीतील तिन्ही नेते दिल्लीला जाण्याची शक्यता आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article