मुलींच्या कुटुंबीयांकडून तपासला जातोय मुलांचा सिबिल स्कोअर

3 hours ago 1

मुलींच्या कुटुंबीयांकडून तपासला जातोय मुलांचा सिबिल स्कोअरFile photo

पुढारी वृत्तसेवा

Published on

31 Jan 2025, 9:28 am

Updated on

31 Jan 2025, 9:28 am

संतोष वळसे पाटील

मंचर: ग्रामीण भागातील मुलांची अगोोदरच लग्नं जमेनात आणि त्यामध्ये आणखी एका अडचणीची भर पडत असल्याचे दिसून येते. मुलींच्या कुटुंबीयांकडून मुलांचा सिबिल स्कोअर तपासला जातोय. त्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांची लग्नं जमविण्यासाठी विविध समस्यांना सामोरे जावे लागण्याची वेळ आली आहे. यामुळे मुलांसह त्यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे.

गेल्या काही वर्षात ग्रामीण भागातील शेती करणार्‍या युवकांचे लग्न जमणे अवघड झाले असून गावागावात तिशी, चाळिशी पार झालेल्या युवकांचे कुटुंबीय मुलीच्या शोधात गावोगावी फिरत आहेत.

या तरुणांचे कुटुंबीय लग्न जमावे म्हणून खटाटोप करत असताना आता मुलींच्या कुटुंबीयांकडून लग्न जमवण्याअगोदर मुलाचा सिबिल स्कोअरची (कर्जाची माहिती) तपासली जात असून मुलावर किंवा त्यांच्या कुटुंबावर कर्ज असेल तर मुलीकडचे नकार देत आहेत. यामुळे इच्छुक युवकांच्या अडचणीत आणखी भर पडली असून लग्नापूर्वीच आपल्या सिबिल स्कोअरची काळजी त्यांना घ्यावी लागणार आहे.

पूर्वीच्या काळी लग्न जमवताना शेती, घरदार, घरासमोर असलेले गाई, म्हशी, बैल, घरात असणारे धान्य यावरून सोयरीक जमवली जायची. त्यानंतर मुलगा चांगला शिकलेला आहे, नोकरीला आहे, घरी थोडीफार जमीन आहे, हे पाहून लग्नं जमवली जात होती. ही लग्नं जमवताना आत्तापर्यंत फक्त मुला-मुलींच्या जन्मपत्रिका व आरोग्यपत्रिका पाहिल्या जात होत्या; आता मात्र मुलांची आर्थिकपत्रिकासुध्दा पाहण्याचे म्हणजेच मुलाचा सिबिल स्कोअर तपासण्याचा प्रकारही वाढला आहे.

मुलीच्या भविष्याची पालकांना काळजी

आपली मुलगी ज्याच्यासोबत लग्न करून आयुष्य व्यतीत करणार आहे, त्या मुलाचे आर्थिक व्यवहार कसे आहेत, मुलावर काही कर्ज तर नाही ना, हे सीबिल स्कोअरच्या माध्यमातून तपासण्याचे काम सध्या मुलीकडचे करताना दिसत आहेत. सिबिल स्कोअर चेक करताना जर मुलावर कर्ज असेल तर लग्नाची बोलणी थांबवण्यात येत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. एकूणच मुलीच्या भविष्याच्या काळजीपोटी ही तपासणी करीत असल्याचे काही पालकांचे म्हणणे आहे.

मुलासह पालकांची जबाबदारी वाढली

गेल्या काही वर्षात ग्रामीण भागात मुख्यत्वे करून शेती करणारे व खासगी तत्त्वावर नोकरी करणार्‍या तरुणांचे लग्न जमवणे अवघड झाले आहे. मुलींच्या कुटुंबीयांकडून अपेक्षा वाढल्या असून मुलाला चांगली नोकरी असावी, पुण्या-मुंबईत फ्लॅट असावा, गावाकडे जमीन, बंगला असावा, चारचाकी महागडी गाडी असावी या अपेक्षा आहेत. यात आता मुलावर व मुलाच्या कुटुंबीयांवर कर्ज आहे का? त्याचे व्यवहार कसे आहेत, याची देखील चौकशी होत आहे. त्यामुळे इच्छुक तरुणांना आपला सिबिल स्कोअर व्यवस्थित ठेवावा लागणार आहे.

विवाह जमवताना माझ्याकडे फ्लॅट आहे, मी नोकरी करतो किंवा माझ्याकडे जमीन आहे. बँकेत माझा सिबिल स्कोअर चांगला आहे, असे सांगितले जाते. प्रत्यक्षात त्यावर विश्वास कसा ठेवायचा म्हणून नियोजित वधूचे कुटुंबीय सिबिल स्कोअर काय आहे, हे आवर्जून विचारतात. साधारण दोन ते अडीच महिन्यांपासून हा प्रश्न विचारला जातो. त्यामुळे विवाह जमविताना अडचणी येतात.

- बाळासाहेब पोखरकर, संस्थापक, जुन्नर-आंबेगाव-खेड वधू-वर संस्था, मंचर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article