मुस्लिम 38 जागांवर निर्णायक, तेथे हवा मुस्लिमच उमेदवार:काँग्रेसच्या अल्पसंख्याक आघाडीचा प्रस्ताव, 28 जागी विजयाचा दावा

11 hours ago 1
लोकसभेला मुस्लिमांचे एकगठ्ठा मतदान महाविकास आघाडीला झाले. म्हणून आता या आकडेवारीच्या आधारे मुस्लिमांतील इच्छुकांनी शक्तिप्रदर्शन सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील २८८ पैकी ३८ विधानसभा मतदारसंघांमध्ये मुस्लिम समाजाची ताकद किती मोठी आहे याची आकडेवारी देत या जागांवर काँग्रेसच्या अल्पसंख्याक आघाडीने दावा केला आहे. मुंबईतील नऊ मतदारसंघांसह राज्यातील एकूण ३८ विधानसभा मतदारसंघांमधील मुस्लिम मतांची आकडेवारी गोळा करून यासंदर्भातील अहवाल महाविकास आघाडीला पाठवण्यात आला आहे. संभाव्य जागावाटपात ३८ जागा ज्या पक्षाला जातील त्यांच्या कोट्यांमधून मुस्लिम उमेदवाराला स्थान दिले जावे अशी मागणी आहे. अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष हाजी इब्राहिम शेख यांनी ही माहिती दिली. त्यामुळे मविआवर दबाव वाढला आहे. मविआच्या नेत्यांकडून मंथन दरम्यान, मुस्लिम मतांचा प्राप्त डाटा पडताळणी मविआने सुरू केली अाहे. खरोखरच दिलेल्या आकडेवारीनुसार मतदारसंघांमध्ये कोणत्या समाजाचे प्राबल्य आहे व संभाव्य उमेदवार निवडताना सुवर्ण मध्य कसा साधायचा यासाठी मविआचे वरिष्ठ नेते विचार करत असल्याचे सांगितले जाते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article