मोठा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा एकनाथ शिंदे दरेगावात जातात, आजही…; शिवसेनेच्या नेत्याचं मोठं विधान

2 hours ago 1

Sanjay Shirsat connected Eknath Shinde : मुख्यमंत्रिपद अन् गृहमंत्रिपदाबाबत सुरु असलेला खल अद्यात संपलेला नाही. आधी मुख्यमंत्रिपदावर दावा करणाऱ्या शिंदे गटाने आता गृहमंत्रिपदावर दावा केला आहे. तसंच एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील दरेगावात आहेत. तिथं जाण्याचं कारण काय? याबाबतचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. वाचा सविस्तर...

मोठा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा एकनाथ शिंदे दरेगावात जातात, आजही...; शिवसेनेच्या नेत्याचं मोठं विधान

एकनाथ शिंदे, नेते, शिवसेनाImage Credit source: Facebook

| Updated on: Nov 30, 2024 | 7:49 AM

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून सात दिवस उलटले आहेत. तरी अद्यापपर्यंत महायुती सरकारचा शपथविधी झालेला नाही. असं असतानाच विधानसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे काम करत आहेत. असं असताना आणि मुख्यमंत्रीपद आणि खातेवाटपाबात महायुतीच्या बैठका नियोजित असताना एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील दरेगाव या त्यांच्या मूळगावी गेले आहेत. तर त्यांचं अस अचानक साताऱ्याला जाणं भुवया उंचावणारं आहे. अशातच शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी मोठं विधान केलं आहे. मोठा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा एकनाथ शिंदे दरेगावात जातात, आजही ते मोठा निर्णय घेणार आहेत, असं शिरसाट म्हणाले.

बातमी अपडेट होत आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article