राजगुरुनगरला भाडेवाढीवरून रास्ता रोको

3 hours ago 1

राजगुरुनगरला भाडेवाढीवरून रास्ता रोकोPudhari

पुढारी वृत्तसेवा

Published on

31 Jan 2025, 9:51 am

Updated on

31 Jan 2025, 9:51 am

खेड: सरकारने एसटी बस प्रवासात केलेली दरवाढ तत्काळ मागे घ्यावी, या मागणीसाठी शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने राजगुरुनगर येथे पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व आमदार बाबाजी काळे यांनी केले.

एकीकडे महागाईला तोंड देत असताना राज्य सरकारने एसटी बस प्रवास दरात 14.97 टक्के भाडेवाढ केली आहे. ती सर्वसामान्य नागरिकांना न परवडणारी आहे. राज्यभर या दरवाढीचा निषेध केला जात आहे. राजगुरुनगर येथे देखील निषेध नोंदविण्यात आला.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक खांडेभराड, तालुकाप्रमुख रामदास धनवटे, महिला जिल्हा संघटिका विजया शिंदे, माजी तालुकाप्रमुख सुरेश चव्हाण, महिला आघाडी तालुकाप्रमुख उर्मिला सांडभोर, ग्राहक संरक्षण कक्ष जिल्हाध्यक्ष बाळासाहेब ताये, युवासेनेचे मृण्मय काळे, बी. के. कदम, शहरप्रमुख संतोष राक्षे, राहुल मलघे, चैतन्य गायकवाड, पूनम पोतले, सरपंच माऊली कड आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

आमदार काळे म्हणाले, एसटी बसमधून सुविधा मिळत नाही. खिळखिळ्या बसने सर्वसामान्य नागरिक प्रवास करीत आहेत. बसस्थानकांमध्ये सोयीसुविधा मिळत नाहीत, तरीही ग्रामीण भागातील नागरिक, विद्यार्थी एसटीने प्रवास करीत आहेत. असे असताना सरकारने भाडेवाढ केली आहे.

ही भाडेवाढ चुकीची आहे, सर्वसामान्य माणसाला ती न परवडणारी आहे. सरकारने भाडेवाढ तत्काळ मागे घ्यावी. मागण्यांचे निवेदन खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे यांना देण्यात आले. या आंदोलनामुळे वाहतूक कोंडी झाली होती. आंदोलन संपल्यानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article