राज्यात कोणत्याही क्षणी विधानसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता:आज मंत्रालयात कॅबिनेटची शेवटची बैठक

4 days ago 5
आधीच लांबणीवर पडलेली महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूका कधी जाहीर होणार आणि आचारंसहिता कधी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. आचारसंहितेबाबत मोठी अपडेट समोर येत असून पुढील दोन दिवसांत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. मंत्रालयात आज सकाळीच मंत्रिमंडळाची शेवटची बैठक आयोजित केली आहे. आधी पितृपक्ष त्यानंतर सणवार या सर्वांचे कारण पुढे करत विधानसभा निवडणूक लांबणीवर पडली आहे. 15 ऑक्टोबरपासून राज्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू होऊ शकते, असे बोलले जात होते. यासंदर्भात निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन राज्यातील विधानसभा निवडणुकींची घोषणा करू शकते, असे अंदाज वर्तवले जात आहेत. महाराष्ट्रातील विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर रोजी संपत आहे. त्याआधी निवडणुका होतील, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केले होते. महाराष्ट्रात 288 जागांवर दोन टप्प्यांत निवडणुका होण्याची शक्यता आहे. तर 15 नोव्हेंबर रोजी मतदान होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाची आज बैठक सद्यस्थितीला मंत्रालयातील हालचाली गतीमान झाल्या आहेत. सुट्टीच्या दिवशी देखील मंत्रालयात अधिकारी आणि कर्मचारी काम करत आहेत. रविवारी सुट्टीच्या दिवशी सामाजिक न्याय विभागाचे सात शासन निर्णय जारी करण्यात आले. त्यानंतर आज सकाळीच मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. महायुती सरकारची ही शेवटची बैठक असू शकते, याबाबतची शक्यता वर्तवली जात आहे. या बैठकीत मोठ्या प्रमाणात निर्णय घेतले जातील, असे म्हटले जात आहे. या बैठकीनंतरच निवडणुकांच्या तारखा आणि आचारसंहिता कधी लागणार याचे उत्तर मिळणार आहे. मागील आठवड्यात दोन मंत्रिमंडळ बैठका आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी अशी थेट होणार आहे. महाविकास आघाडीने महायुती विरोधात जोरदार तयारी केली जात आहे. त्यामुळे महायुती सरकारकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासन निर्णयांचा धडाका लावला जात आहे. थेट लोकांशी संबंधित असलेल्या योजना राबवण्यात येत आहेत. यामध्ये लोकप्रिय योजना तसेच महायुतीमधील नेत्यांच्या फायद्याचे निर्णय होताना दिसत आहे. मागील आठवड्यात दोन मंत्रिमंडळ बैठका झाल्याचे पहायला मिळाले. या निर्णयांवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article