राज्यात राजकीय घडामोडींना वेग:'परिवर्तन महाशक्ती'ची पुण्यात आज महत्वपूर्ण बैठक, जागावाटपावर चर्चा होणार

2 hours ago 1
महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग परिवर्तन महाशक्तीची आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने नियोजन बैठक संभाजीराजे,बच्चू कडू,राजू शेट्टी यांची आज पुण्यात स्वराज्य भवनात महत्वपूर्ण बैठक होणार आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभा निवडणूक लागली असून सर्वच राजकीय पक्ष जोमाने कामाला लागले असल्याचे यानिमित्ताने दिसून येत आहे. 'परिवर्तन महाशक्ती' देखील या निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे दिसून येत आहे. परिवर्तन महाशक्तीच्या नेते एकत्र आज गुरुवार, दि. 17 ऑक्टोबर रोजी पुणे शहरातील स्वराज्य भवन, संचेती हॉस्पिटलसमोर, शिवाजीनगर येथे दुपारी 3 वा. नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीकरिता छत्रपती संभाजीराजे (प्रमुख, महाराष्ट्र स्वराज्य पक्ष), बच्चू कडू (अध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष), राजू शेट्टी (संस्थापक स्वाभिमानी शेतकरी संघटना), वामनराव चटप (अध्यक्ष, स्वतंत्र भारत पक्ष), शंकरअण्णा धोंडगे (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य समिती), नारायण अंकुशे (अध्यक्ष, भारतीय जवान किसान पार्टी) यांच्यासह समविचारी पक्ष एकत्रित येणार आहेत. अशी माहिती स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव यांनी दिली. राज्यातील सर्व जागांवर परिवर्तन महाशक्ती त्यांचे उमेदवार उभे करणार आहे. त्यादृष्टीने मराठा नेते मनोज जरांगे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड प्रकाश आंबेडकर यांच्याशी देखील छत्रपती संभाजी राजे यांनी चर्चा केली आहे. आजच्या बैठकीत उमेदवार ठरविण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांना पर्याय देण्याचा प्रयत्न यामाध्यमातून करण्यात येत असून मतदारांना नवीन पर्याय उपलब्ध करून दिला जात आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article