हे चक्रीवादळ शुक्रवारी श्रीलंकेजवळ होते. त्याचा वेग 60 ते 70 कि.मी.होता. शनिवारी तो 80 ते 90 कि.मी.इतका होणार आहे. मात्र या चक्रीवादळाचा राज्यावर थेट परिणाम दिसणार नाही. पावसाचा अंदाज नाही. मात्र दाट धुके अन् थंडी असे वातावरण राहील, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी दिला आहे.
राज्याचे शुक्रवारचे तापमान
अहिल्यानगर 8.3, पुणे 9.5, जळगाव 10, महाबळेश्वर 10.5, नाशिक 10.6, मालेगाव 12.6, सांगली 12.7, सातारा 12.2, सोलापूर 12.8, धाराशिव 12.2, छ.संभाजीनगर 10.6, परभणी 10, अकोला 14.6, अमरावती 14.5, बुलडाणा 12.6, ब्रम्हपुरी 11.6, चंद्रपूर 14.2, गोंदिया 10.9, नागपूर 13.2, वाशिम 13, वर्धा 12.9, मुंबई 21.4, कोल्हापूर 15