राणी सती धाम येथे उद्यापासून तीन दिवसीय दादी यांचा प्रकटोत्सव:22 ते 24 नोव्हेंबर दरम्यान धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
10 hours ago
1
राणी सती दादी यांच्या वार्षिक प्रगटोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जि. प. रस्त्यावरील राणी सती धाम येथे दादी यांचा प्रकटोत्सव २२ ते २४ नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या तीन दिवसीय उत्सवात अनेक कार्यक्रमांची रेलचेल भक्तांना बघावयास मिळणार आहे. उत्सवाचा प्रारंभ शुक्रवारी, २२ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता भजनकार गोपाल शर्मा हारे यांच्या भजन संध्येने होणार आहे. दादींच्या जगत कल्याणावर भजनकार गोपाल शर्मा हे भजने सादर करणार आहेत. दादींचा प्रकटोत्सव शनिवारी, २३ नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. यावेळी धाममध्ये सायंकाळी ६.४५ वाजता दादींचा ५६ भोग दर्शन सोहळा साकार करण्यात येणार आहे. यावेळी मातेची महाआरती भक्तांच्या समवेत होणार आहे. रविवारी, २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजेपासून ५६ भोग दर्शन व जात पूजा अर्चना सोहळा होणार असून दुपारी २ वाजता भजन गायिका निधी मंत्री यांचा भव्य दादी मंगलपाठ कार्यक्रम होणार आहे. या उत्सवासाठी राणीसाठी धाममध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून भक्तांसाठी पूजा सामग्री, प्रसाद व विविध स्वादिष्ट व्यंजन व अल्पोपहाराचे स्टॉल लावण्यात येत आहेत. तसेच उत्सवात विशेष आकर्षण म्हणून लक्ष्मी नारायण व राधाकृष्ण झाकी साकार करण्यात आली आहे. दादी भक्तांनी या तीन दिवसीय सोहळ्याचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन स्थानीय राणीधाम येथे धामचे अध्यक्ष जगदीश प्रसाद बाछुका यांनी केले. उत्सवाच्या यशस्वितेसाठी जगदीशप्रसाद बाछुका यांच्या अध्यक्षतेत सचिव नवीन झुनझुनवाला, सज्जन अग्रवाल, श्याम चंगोईवाला, अनिल पाडिया, कमलकिशोर गुप्ता, आनंद अग्रवाल, मनीष बाछुका, फुलचंद पटवारी यांच्यासह राणी सती सेवा समिती, राणी सती कार्यकारिणी तथा राणी सती महिला कार्यकारिणीचे पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)