जिल्ह्यात सरासरी ६७.०३ टक्के मतदान
लातूर शहर विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी ६२.६ टक्के मतदान
लातूर (Latur Assembly Elections) : लातूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघासाठी जिल्ह्यात सरासरी ६६.९१ टक्के मतदान झाले. बुधवारी (दि.२०) सकाळी ७ पासून सायंकाळी ६ पर्यंत हे मतदान झाले. यात सर्वाधिक म्हणजे ६९.९२ टक्के मतदान (Latur Assembly Elections) लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात झाले तर सर्वात कमी म्हणजे ६२.७४ टक्के मतदान लातूर शहर विधानसभा मतदारसंघात झाले. जिल्ह्यात सायंकाळी ६ वाजेपर्यंत शांततेत सुमारे ६७.०३ टक्के मतदान झाले.
निवडणूक विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार (Latur Assembly Elections) लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ- ६९.९२ टक्के, लातूर शहर विधानसभा मतदारसंघ – ६२.७४, अहमदपूर विधानसभा मतदारसंघ – ६८.७१, उदगीर (अ.जा.) विधानसभा मतदारसंघ – ७१.११, निलंगा विधानसभा मतदारसंघ – ६५.७५ तर औसा विधानसभा मतदारसंघ – ६८.८८ टक्के इतके मतदान झाले.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी (Latur Assembly Elections) जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान पार पडले. जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात विविध राजकीय पक्षांसह अपक्ष असे एकूण १०६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. किरकोळ अपवाद वगळता मतदान प्रक्रिया शांततामय आणि भयमुक्त वातावरणात पार पडली. जिल्ह्यातील २ हजार १४२ मतदान केंद्र आणि १ सहाय्यकारी मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया झाली असून यासाठी २ हजार ३८३ मतदान पथके तैनात होती. प्रत्येक मतदान पथकामध्ये मतदान केंद्राध्यक्ष, प्रथमस्तरीय मतदान केंद्र अधिकारी आणि दोन इतर मतदान केंद्र अधिकारी कार्यरत होते. एकूण ९ हजार ५३४ अधिकारी, कर्मचारी या मतदान पथकांमध्ये होते. यासोबतच पोलीस, गृहरक्षक दल यांचीही मदत झाली.
अभिनव सजावट, अभिनव मतदान केंद्रे
लातूर शहर (Latur Assembly Elections) विधानसभा मतदारसंघातील रेनिसन्स सीबीएसी इंटरनॅशनल शाळेत ‘हरित लातूर’ या संकल्पनेवर आधारित मतदान केंद्र उभारण्यात आले होते. विविध वृक्षांच्या रोपांची मांडणी, विविध जैव विविधतेच्या चित्रांची सजावट याठिकाणी करण्यात आली होती. उदगीर येथील लाल बहाद्दूर शास्त्री विद्यालयात यापैकी एक अभिनव मतदान केंद्र उभारण्यात आले होते. या मतदान केंद्रावर महाराष्ट्राच्या ग्रामीण परंपरेचे दर्शन घडविणाऱ्या प्रतिकृती आणि फलक लावण्यात आले होते.