‘चंदगड’ला शिवाजी पाटील ठरले जायंट किलर

2 hours ago 1
पुढारी वृत्तसेवा

Published on

24 Nov 2024, 2:00 am

Updated on

24 Nov 2024, 2:00 am

गडहिंग्लज : चंदगड विधानसभा मतदारसंघात पाचही तुल्यबळ उमेदवार निवडणूक रिंगणात आल्याने या ठिकाणची निवडणूक नेमकी कोण जिंकणार, याबाबत मोठ्या चर्चा झाल्या होत्या. अनेक तर्कवितर्क लढविण्यात आले; मात्र या सगळ्याला छेद देत भाजपचे बंडखोर उमेदवार शिवाजी पाटील यांनी जायंट किलरची भूमिका घेत मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला. सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मतदान झाल्यावर जी आकडेमोड मांडली होती, त्याच्याही पुढे मतदानामध्ये आकडे दिसून आले.

महायुतीकडून राजेश पाटील, महाविकास आघाडीकडून नंदा बाभूळकर, भाजपचे बंडखोर शिवाजी पाटील, काँग्रेसचे बंडखोर अप्पी पाटील यांच्यासह जनसुराज्यचे मानसिंग खोराटेही रिंगणात आले होते. चंदगडला जोरदार चुरस वाढली होती. राजेश पाटील व नंदा बाभूळकर यांनी मोठ्या सभा घेतल्या. शिवाजी पाटील यांनी एकाही मोठ्या नेत्याला न बोलविता स्वतःच सभा घेत मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. यामुळे मोठ्या सभांचा परिणाम केवळ चर्चेपुरता झाला. प्रत्यक्षात शिवाजी पाटील हे या ठिकाणी जायंट किलर ठरले.

मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात आजरा तालुक्यातील कोळिंद्रे जि. प. मतदार संघाची मोजणी सुरू झाली. या मतदारसंघातून राजेश पाटील यांना अधिक मताधिक्य मिळेल व त्यांच्या पाठोपाठ नंदा बाभूळकर राहतील व या ठिकाणी शिवाजी पाटील हे चौथ्या क्रमांकावर राहतील, असाच कयास बांधला होता; मात्र शिवाजी पाटील यांना याच मतदारसंघातून वाढीव मताधिक्य मिळाले. यामुळे पाटील यांच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला.या ठिकाणी सुरू झालेली मतांची आघाडी शेवटपर्यंत कमी झालीच नाही. उलट जसजसे पाटील यांच्या मतदारसंघाकडे मतमोजणी गेली, तसे आघाडी मोठ्या प्रमाणात वाढत गेली.

शिवाजी पाटील हे भाजपचे बंडखोर म्हणून अपक्ष रिंगणात आले असले, तरी प्रत्यक्षात देवेंद्र फडणवीस यांचे ते विश्वासू असल्याने विजयानंतर ते भाजपसोबतच राहणार आहेत. गडहिंग्लज व चंदगड तालुक्यातील भाजपची मोठी फळी त्यांच्यासोबत काम करत होती. साहजिकच भाजपचेही बळ त्यांना यानिमित्ताने लाभले. मनसेच्या नागेश चौगुले, शिंदे गटाच्या अनिरुद्ध रेडेकर यांनी त्यांना पाठिंबा देत सहकार्य केले. शिवाजी पाटील यांचा विजय सुकर करण्यात त्यांनी पाच वर्षे केलेली विकासकामे तसेच चंदगड मतदारसंघाशी जुळवून घेतलेली नाळ हीदेखील कारणीभूत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article