EVM: 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि महायुतीला बहुमत मिळाल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय आणि मनोरंजन विश्वात अकने चर्चा रंगत आहेत. अनेक सेलिब्रिटी निकालावर स्वतःचं स्पष्ट मत मांडत आहे. आता अभिनेत्री स्वरा भास्कर हिने देखील सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत EVM मध्ये घोटाळा असल्याचा संशय व्यक्त केला आहे. सांगायचं झालं तर अभिनेत्रीचा नवरा फहाद खान अणूशक्ती नगर येथून निवडणुकीच्या रिंगणात होते. पण फहाद खान यांचा पराभव झाला आहे. नवऱ्याच्या पराभवानंतर स्वरा हिने सोशल मीडियावर लक्षवेधी पोस्ट केली आहे.
स्वरा भास्करचा पती फहाद अहमद महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने फहाद अहमद यांना अणुशक्ती नगर या जागेवर उमेदवारी दिली होती. पण त्यांचा पराभव झाला. नवऱ्याच्या पराभवानंतर स्वरा हिची पोस्ट चर्चेत आली आहे.
हे सुद्धा वाचा
एक्सवर (ट्विटर) स्वरा भास्कर हिने पोस्ट केली आहे. ‘मतदान संपूर्ण दिवस असूनही ईव्हीएम मशीन 99% चार्च कसं होऊ शकतं? यावर निवडणूक आयोगाने उत्तर द्यावे… अणुशक्ती नगर विधानसभेत 99% चार्ज मशीन उघडल्याबरोबर भाजप समर्थित राष्ट्रवादीला मते कशी मिळू लागली?’ असा प्रश्न देखील स्वरा भास्कर हिने उपस्थित केला आहे. अभिनेत्रीच्या पोस्टवर नेटकरी कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत.
पूरा दिन वोट होने के बावजूद EVM मशीन 99% कैसे चार्ज हो सकती है ? इलेक्शन कमीशन जवाब दे.. @ECISVEEP @SpokespersonECI अणुशक्ति नगर विधानसभा में जैसे ही 99% चार्ज मशीने खुली उसके बीजेपी समर्थित एनसीपी को वोट मिलने लगे आख़िर कैसे ? @NCPspeaks
— Swara Bhasker (@ReallySwara) November 23, 2024
सांगायचं झालं तर, ‘अनुशक्ती नगर’ मतदारसंघात फहाद अहमद यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या उमेदवार सना मलिक यांना उमेदवारी देण्यात आली होती. सना मलिक यांचा विजय झाला आहे. सना मलिक या नवाब मलिक कन्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजप 128 जागांवर विजय मिळवला आहे.
अभिनेत्री स्वरा भास्कर हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे. पण आई झाल्यानंतर अभिनेत्रीने अभिनयापासून ब्रेक घेतला आहे. ‘वीरे दि वेडिंग’, ‘सरभरी’, ‘रांझना’, ‘तनु वेड्स मनु’, ‘प्रेम रतन धन पायो’ यांसारख्या सिनेमांमध्ये अभिनेत्रीने महत्त्वाची भूमिका साकारली आहे.
स्वरा आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेत्री राजकारणावर देखील स्वतःचं स्पष्ट मत मांडत असते. ज्यामुळे स्वराला ट्रोलींगचा देखील सामना करावा लागतो.