Published on
:
24 Nov 2024, 6:13 am
Updated on
:
24 Nov 2024, 6:13 am
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या नांदगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार सुहास कांदे यांनी दुसऱ्यांदा बाजी मारली. तर माजी खासदार समीर भुजबळ यांना पराभव स्वीकारावा लागला.
सुहास कांदे यांच्यासमोर समीर भुजबळ यांच्यासह उ भा ठा गटाचे गणेश धात्रक,तर रोहन बोरसे यांनी अपक्ष आव्हान उभे केले होते. मात्र नांदगावच्या मतदारांनी आमदार सुहास कांदे यांच्या पारड्यामध्ये भरभरून मतदान टाकत कांदे यांच्या बाजूने कौल देतं ९०हजार ची विजयी आघाडी घेतली. नांदगाव मतदार संघची एकुण २५ फेरीच्या माध्यमातून मतमोजणी पार पडली. पहिल्या फेरीपासून, सुहास कांदे यांनी आघाडी घेतली होती, तर शेवटच्या फेरीपर्यंत सुहास कांदे यांनी आपली आघाडी कायम राखली.
एकूण पडलेले मताधिक्य
सुहास कांदे १३७२५७
समीर भुजबळ ४७९०८
डॉक्टर रोहन बोरसे २७८१४
गणेश धात्रक २१८५९
टपाली मतदान
सुहास कांदे ८११
समीर भुजबळ २८६
डॉक्टर रोहन बोरसे २९४
गणेश धात्रक २५१
माजी खासदार समीर भुजबळ यांच्याकडून नांदगाव भयमुक्त करण्याचा नारा देत ही निवडणूक लढण्यात आली होती, तर सुहास कांदे यांच्याकडून विकासाचा मुद्द्यावर निवडणूक लढवण्यात आली होती.
नांदगावकरांचा मी शतशः आभारी आहे. माझ्यावर परत टाकलेला विश्वास मी परत सार्थ ठरवेल. आणि अजून जोमाने नांदगाव मतदार संघाचा विकास करेल. मतदार संघाचा शेतकरी सुजलाम सुफलाम होईल, भविष्यात करंजवणचे पाणी, शिवसृष्टीचे संपूर्ण काम, मनमाड येथे भीमसृष्टी, ७८ खेडी पाणी योजना हेच माझे पुढील ध्येय.
आमदार सुहास कांदे , नादंगाव
पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा
नांदगाव मतदारसंघ निवडणूक काळात सेन्सिटिव्ह वातावरण निर्माण झाले होते. यामुळे नांदगावला अतिरिक्त पोलीस फौज फाटा बोलाविण्यात आला होता. निकालाच्या दिवशी नांदगावला छावणीचे स्वरूप आले होते.
निवडणूक अधिकाऱ्याच्या कार्यक्षमतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह?
निवडणूक प्रशासनाच्या वतीने पत्रकारांना मतमोजणी बाबत माहिती देण्यासाठी कुठलीही सहकार्याची भूमिका निवडणूक प्रशासनाकडून घेतली नाही पत्रकारांना मतमोजणी केंद्रापासून बऱ्याच अंतरावर मतदान कक्ष उभारण्यात आल्याने या कक्षेत कुठल्याही सुविधा पुरविण्यात आलेल्या नव्हत्या तर निवडणूक निकालाबाबत पत्रकारांना माहिती देण्यास बराच उशीर करण्यात येत होता तर पत्रकारांना माहिती मिळणे अगोदरच बाहेरील व्हाट्सअप ग्रुप वर मतदानाच्या आकडेवारीबाबत पोस्ट व्हायरल होताना दिसत होत्या यामुळे निवडणूक प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर पुन्हा प्रश्न चिन्ह उभे राहिले आहे. नांदगाव मतदार संघातील उमेदवारी माघारी घेण्याचा शेवटच्या दिवशी निवडणूक प्रशासनाच्या वतीने उमेदवारी माघारी नंतर राहिलेल्या उमेदवारांची माहिती देण्यास माहिती देण्यास निवडणूक निर्णय अधिकारी सुरेखा चव्हाण यांच्याकडून दिरंगाई करण्यात आली होती ,
आमदार सुहास कांदे यांची कार्यकर्त्यांकडून फटाके फोडत व गुलालाची उधळण करत जल्लोषात विजयी मिरवणूक काढण्यात आली.(छाया : सचिन बैरागी)
आमदार सुहास कांदे यांच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष करत नांदगाव तहसील पासून मिरवणूक काढली होती. या मिरवणुकीमध्ये आमदार सुहास कांदे यांच्या पत्नी सौ अंजुमताई कांदे यांच्यासह कांदे कुटुंब सहभागी झाले होते. यावेळी कार्यकर्त्यांकडून गुलालाची उधळण करत, फटाकड्यांची आकाश भाजी करण्यात आली.तसेच ग्रामीण भागामध्ये देखील आणि गावांमध्ये फटाकड्यांच्या आत शिवाजी करत मिरवणुकी काढण्यात आल्या होत्या.एकंदरीत निवडणुकीनंतर नांदगाव मध्ये शांततेचे वातावरण होते.
नांदगावकरांनी आम्हाला दिलेलं प्रेम मी कधीच विसरू शकत नाही. त्यांचे आभार मानायला अक्षरशः माझ्याकडे शब्द नाही. मतदानाच्या रूपाने आम्हाला जे प्रेम दिल त्याबद्दल नांदगावकरांचे आम्ही शतशः ऋणी आहोत. सर्वांचे मनःपूर्वक आभार, नांदगावच्या जनतेने दिलेला कौल स्विकारतो
सौं अंजुम सुहास कांदे
पुन्हा नव्या जोमाने लढत नांदगावच्या विकासासाठी कायमच प्रयत्नशील राहणार. विधानसभा मतदारसंघातील जनतेचे प्रश्न कसे लवकरात लवकर मार्गी लागतील यासाठी देखील नेहमी प्रयत्न करत राहील
समीर भुजबळ, अपक्ष