लोकसभेतील गंभीर चुका सुधारल्याचा थेट फायदा:जागा जिंकण्याचा देवेंद्र फडणवीसांमुळे भाजपचा विक्रम प्रस्थापित

2 hours ago 1
जागा वाटप, विरोधकांच्या नरेटिव्हला प्रत्युत्तर देणे या लोकसभेतील चुका टाळल्याने भाजपला विधानसभेत विक्रमी यश मिळाले. महाराष्ट्राच्या राजकारणातील इतिहासात १४८ जागा लढवून १३२जागा जिंकणारा भाजप पहिला पक्ष ठरला. परराज्यातील नेत्यांची फौज प्रचार नियोजनात देशातील अनुभवी दिग्गज १५ नेत्यांची फौज तैनात केली. हा धडा शिकला जागा वाटपात लोकसभेप्रमाणे घोळ होणार नाही याची काळजी घेतली. पुढे काय ? अजित पवारांच्या दबावाला बळी न पडता भाजप आक्रमक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पुढे जाईल. मुंबईसह इतर मनपा, जिल्हा परिषद जिंकण्यासाठी तयारी सुरू होईल. आक्रमक काउंटर नरेटिव्ह विरोधकांच्या प्रत्येक नरेटिव्हला भाजपने काउंटर नरेटिव्हने आक्रमक उत्तर दिले. शाहांनीही निवडले उमेदवार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वत: काही उमेदवारांची निवड केली. महायुतीतील जागावाटपात हस्तक्षेप केला. उमेदवारांची अदलाबदली जेथे मित्रपक्षाकडे मजबूत उमेदवार नव्हता अशा ठिकाणी उमेदवारांची अदलाबदल केली. नेत्यांनाही संदेश : बटेंगे तो कटेंगे महायुतील सर्व नेत्यांमध्येही ताळमेळ आ‌वश्यक असे सांगत त्यांनाही ‘बटंगे तो कटेंगे’चा संदेश दिला.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article