मूर्तिजापूरमध्ये भाजपचे हरीश पिंपळे यांचा विजयाचा चौकार‎:काम करणारा आमदार म्हणून मतदारांची पसंती‎

1 hour ago 1
मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे‎उमेदवार हरीश मारोतीप्पा पिंपळे यांनी विक्रमी‎मताधिक्याने विजय प्राप्त करून विजयाचा‎चौकार लावून इतिहास घडवला . मूर्तिजापूर‎मतदारसंघात तिरंगी लढत पाहावयास‎मिळाली. यामध्ये भाजप, राष्ट्रवादी‎काँग्रेस(शरद पवार गट) व वंचित बहुजन‎आघाडी यांच्यात लढत झाली. सकाळी नऊ‎वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर‎भाजपचे उमेदवार हरीश पिंपळे यांनी अल्पशी‎आघाडी घेतली होती. परंतु प्रत्येक फेरीत‎त्यांना क्रमाक्रमाने मताधिक्य प्राप्त होत गेले‎आणि २८ व्या फेरीत त्यांचा विजय‎सुनिश्चित झाला. विजयानंतर कार्यकर्त्यांनी‎शहरात जल्लोष केला. फटाक्यांची‎आतिषबाजीने शहर दणाणून गेले होते.‎ फुलांची उधळण करत जेसीबीवरून‎आमदार हरीश पिंपळे यांची मिरवणूक‎काढण्यात आली. विधानसभा‎निवडणुकीसाठी एकूण २ लाख ६ हजार ७८६‎मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.‎शनिवारी झालेल्या मतमोजणीत भाजपचे‎उमेदवार हरीश पिंपळे यांना ९१, ८२० एवढे‎विक्रमी मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे‎(शरद पवार) सम्राट डोंगरदिवे यांना ५५ हजार‎९५६ एवढी मते मिळाली. वंचित बहुजन‎आघाडीचे डॉ. सुगत वाघमारे यांना ४९ हजार‎६०८ एवढे मताधिक्य प्राप्त झाले. तिरंगी‎लढतीत हरीश पिंपळे यांनी ३५ हजार ६८४‎मतांनी विजय प्राप्त केला. २३ नोव्हेंबरला पार‎पडलेल्या मूर्तिजापूर विधानसभा‎मतदारसंघाची मतमोजणी येथील तहसील‎गोडावूनमध्ये घेतली . दुपारी साडेचारला‎मतमाेजणीची प्रक्रिया आटाेपली. निवडणूक‎निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय‎अधिकारी संदीप अपार यांनी काम पाहिले.‎‎ यामु‌ळे‎ मिळाला ‎जनमताचा ‎कौल‎ मूर्तिजापूर मतदारसंघातून विजयी झाल्याचे घाेषीत हाेताच भाजपचे उमेदवार हरीश‎पिंपळे यांनी पत्नी, मुलगा आणि मुलीसह मतदान केंद्राबाहेर आनंद व्यक्त केला.‎‎ सुरवातीला नाकारली‎ होती उमेदवारी‎ या विधानसभा निवडणुकीमध्ये‎मतदारसंघात आणि पक्षातील कार्यकर्त्यांची‎नाराजी पाहता भारतीय जनता पक्षाला गड‎राखणे अवघड होईल, अशी चर्चा‎राजकीय जाणकारांद्वारा वर्तवल्या जात‎होती. परंतु मतदात्यांनी सर्व चर्चांना‎पूर्णविराम देत पुन्हा हरीश पिंपळे यांनाच‎विजयी करून भारतीय जनता पक्षाचा गड‎राखून गरिमा वाढवल्याचे दिसून आले.‎विशेष म्हणजे आमदार हरिश पिंपळे यांना‎पक्षाकडून यावेळेस सुरवातीला उमेदवारी‎नाकारण्यात आली हाेती. परंतु शेवटच्या‎क्षणी त्यांना उमेदवारी देण्यात आले. त्याचे‎रूपांतर त्यांनी विजयात केले. त्यांच्या‎विजयाचा नागरिकांनी जल्लाेष केला.‎

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article