हिंदुत्वासाठीच बंडखोरीचा मुद्दा मतदारांना पटवला:एकनाथ शिंदेंचे नेतृत्वाचे गुण सिद्ध झाले
2 hours ago
1
हिंदुत्वासाठी बंडखोरी केली हा एकनाथ शिंदे यांचा दावा जनतेला अपील झाला. लाडकी बहीण योजनेचे श्रेयही त्यांना मिळाले. पुन्हा स्ट्राइक : लोकसभेत पक्षाला यश मिळवून दिले. त्यापेक्षा जास्त कामगिरी करत त्यांनी पुन्हा स्ट्राइक रेट वाढवला.
लोकसभेच्या यशानंतर हुरळले नाहीत विकासाचे राजकारण : शिंदेसेनेला विकासाच्या राजकारणातच स्वारस्य आहे, असे शिंदेसेनेने वारंवार सांगितले. गद्दारीचा शिक्का : हिंदुत्वासाठीच बंडखोरी केली, हा मुद्दा शिंदेसेनेने मतदारांना पुन्हा एकदा ताकदीने पटवून दिला. पुढे काय ? आता केेंद्रात आणि सत्तेत असल्याचा फायदा घेत शिंदसेनेच्या आमदारांना आपला पाया आणखी मजबूत करता येईल. मुंबई मनपात प्रभाव वाढेल. तडजोड मान्य केली काही जागांवर आमचा उमेदवार घ्या, हा भाजपचा आग्रह मान्य करत शिंदेसेनेने तडजोड केली. मुस्लिम मतदारांशी जवळीक भाजप मुस्लिमविरोधी धोरण राबवत असताना शिंदेसेनेने मात्र ठिकठिकाणी मुस्लिम मतदारांशी जवळीक साधली. योग्य जागा निवडल्या मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत जास्त जागा लढवण्याची त्यांची रणनीती योग्य ठरली. एकी कायम ठेवली अखेरच्या क्षणापर्यंत शिंदेसेनेतील नेते, आमदारांनी एकी कायम ठेवली. कुठेही बेकीचा सूर लावला नाही.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)