विनापरवानगी मिरवणुका; पहिल्याच दिवशी नियम धाब्यावर:पोलिसांची मिरवणुकांवर होती बंदी, सर्वच आमदारांचा रस्त्यांवरच विजयी जल्लोष
2 hours ago
1
अनंत कष्ट उपसल्यानंतर विधानसभा निवडणुकीत मिळालेला विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी नवनिर्वाचित आमदारांनी विजयी मिरवणुका काढल्या. विशेष म्हणजे विजयी मिरवणुकांवर प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली होती. हा आदेश मोडला तर कारवाई करण्याचा दमही पोलिसांनी भरला होता. असा नियम वर्षानुवर्षे अस्तित्वात असून तो केवळ कागदावरच राहतो हे उघड झाले. आमदार होताच नवनिर्वाचित आमदारांनी कायदा मोडत विजयी रॅली काढल्या. या रॅलींमुळे जालना रोड, अहिल्याबाई होळकर चौक, क्रांती चौकात वाहतूक कोंडी झाली होती. निवडणुकीमुळे शहर व ग्रामीण भागात सध्या जमावबंदीचा आदेश लागू आहे. जमावबंदी असताना अशा मिरवणुका काढता येत नाहीत, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले होते. परंतु नवनियुक्त आमदारांनी पहिल्याच दिवशी कायदा मोडला. आमदारांच्या विजयी मिरवणुकीमुळे सर्वसामान्य संभाजीनगरकरांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला. जालना रोडवर तासभर वाहतूक ठप्प, नंतर संथ सेंट फ्रान्सिस हायस्कूलसमोरील जालना रोडवर सकाळपासून एमआयएम - भाजप कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. आकाशवाणी चौकातून जालन्याकडे जाणाऱ्या रोडवर एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी दुचाकी, चारचाकी आणि रिक्षा उभ्या केल्या होत्या. त्यामुळे वाहतूक संथ सुरू झाली. सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत वाहतूक संथ होती. त्यानंतर ४.३० वाजता सावे विजयी झाले अन् इम्तियाज पराभूत झाले. त्यामुळे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते जालना रोडवर जमले. यामुळे गोंधळ उडाला. पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. याचसोबत अतुल सावे यांच्या विजयी रॅलीला सुरुवात झाली. त्यामुळे तासभर वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत केली. फटाक्याने महिला पोलिस जखमी जैस्वाल यांच्या कार्यकर्त्यांनी येथे फटाके फोडण्यास सुरुवात केली. या वेळी फटाक्याच्या ठिणगीने महिला पोलिस कर्मचाऱ्याचा रुमाल जळाला. यासह या कर्मचारी महिलेच्या हनुवटीवरील त्वचा भाजली. यामुळे त्या किरखोळ जखमी झाल्या. त्यांना पोलिस वाहनात उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. तब्बल दोन तास वाहतूक कोंडी
उमेदवारांच्या विजयी मिरवणुकांमध्ये जालना रोडवर अशी गर्दी होऊन प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. याचा सर्वसामान्य संभाजीनगरकरांना नाहक त्रास सहन करावा लागला. ...तर कारवाई केली जाईल
कार्यकर्ते घरी जात असताना ही वाहतूक कोंडी झाली होती. तत्काळ पोलिसांनी ही वाहतूक कोंडी सोडवली. विजयी मिरवणुकीला प्रशासनाने परवानगी दिली नाही. तसे आढळल्यास कारवाई करण्यात येईल. -नितीन बगाटे, पोलिस उपायुक्त. आमदार संजय शिरसाट यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यासोबत जल्लोष केला. त्यानंतर मतमोजणी केंद्र गाठले. त्या वेळी क्रांती चौकाकडून कोकणवाडीकडे जाणारा एका बाजूचा रस्ता शिरसाटांच्या मिरवणुकीने व्यापून गेला होता. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. दरम्यान, शिरसाट यांचे आगमन झाल्यावर पुन्हा एकदा रस्त्यावर अभूतपूर्व कोंडी झाली. रॅलीमुळे एसएससी बोर्डापासून कोकणवाडी चौकापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. थेट सवाल नितीन बगाटे विजयी मिरवणुकीला परवानगी नसताना रॅली निघाल्या, त्यावर कारवाई होणार का? निश्चित. विजयी मिरवणुकीला परवानगी नाही. मतदान केंद्रावरील उपस्थित कार्यकर्ते घरी जाताना वाहतूक कोंडी झाली. रॅलीमुळे झालेल्या वाहतूक कोंडीला जबाबदार कोण? प्रशासनाच्या वतीने वाहतुकीत बदल केला होता. त्यानुसार वाहतूक वळवण्यातही आली. पोलिसांनी तत्काळ वाहतूक कोंडी दूर केली. रॅली काढणाऱ्यांवर कारवाई करणार का? प्रशासनाच्या वतीने रॅली, मिरवणुकांना परवानग्या देण्यात आलेल्या नाहीत. तसे आढळल्यास निश्चित कारवाई करू.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)