Published on
:
21 Nov 2024, 12:35 pm
Updated on
:
21 Nov 2024, 12:35 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क: पाकिस्तानच्या वायव्य भागात असलेल्या खैबर पख्तुनख्वामधील कुर्रम जिल्ह्यात शिया मुस्लिमांना घेऊन जाणाऱ्या प्रवासी वाहनावर बंदूकधाऱ्यांनी अंदाधूंद गोळीबार केला. या भीषण हल्ल्यात ३८ जण ठार झाले आहेत. मृतांमध्ये सहा महिलांचाही समावेश आहे.30 जण जखमीही झाले आहेत. दहा जणांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
कुर्रम जिल्ह्यात शिया आणि सुन्नी मुस्लिमांमधील परस्पर हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी पाराचिनारहून पेशावरच्या दिशेने जाणाऱ्या प्रवासी वाहनांवर गोळीबार केला. पोलीस अधिकारी अजमत अली यांनी सांगितले की, मृतांमध्ये सहा महिलांचाही समावेश आहे.
Deadly attack ०n on vehicle carrying in Pakistan 28 died