रामटेकमधून शिंदेंचा उमेदवार जाहीर:आमदार आशिष जयस्वाल यांची वर्णी, 2019 मध्ये अपक्ष लढवली होती निवडणूक

4 days ago 3
रामटेक विधानसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थिती अत्यंत गुंतागुंतीची होत आहे. महायुतीकडून शिवसेना शिंदे गट आणि भाजप तर महाविकास आघाडीकडून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने या मतदारसंघावर दावा केला आहे. त्यामुळे जागा वाटपाचा पेच निर्माण होणार हे निश्चित असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी पारशिवनी येथील कार्यक्रमात आमदार आशिष जयस्वाल यांची उमेदवारी जाहीर करून आश्चर्याचा धक्का दिला आहे. राज्यात अजून महायुती वा महाविकास आघाडीचे जागा वाटप निश्चित व्हायचे आहे. आचारसंहीता जाहीर झाल्यानंतर ते जाहीर होवू शकते. असे असताना मुख्यमंत्र्यांनी जयस्वाल यांना रामटेक येथून उमेदवारी जाहीर केली आहे. 2019 मध्ये युतीधर्माचे पालन न करता जयस्वाल यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. यापूर्वी तीनदा ते शिवसेनेकडून निवडून आले होते. राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर शिवसेना शिंदे गटाला समर्थन देणारे आशिष जयस्वाल सेनेतून बंडखोरी करून निवडून आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी अतिशय निकटचे संबंध असल्याचा फायदा त्यांना नेहमीच झाला. ठाकरे गटाचा आक्षेप महाविकास आघाडीतही रामटेक विधानसभा मतदारसंघावरून वादाची ठिणगी पडू शकते. 2024 लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे विजयी झाल्यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला आहे. काँग्रेसकडून माजी मंत्री राजेंद्र मुळक इच्छुक आहेत. बर्वे यांच्या विजयानंतर झालेल्या आभार सभेत रश्मी बर्वे यांनी मुळक हे रामटेक विधानसभेचे पुढील उमेदवार असल्याचे घोषित केले. शिवसेनेचे (ठाकरे गट) उपजिल्हाप्रमुख प्रेम रोडेकर यांनी या घोषणेवर आक्षेप घेतला असून, शिवसेनेचा हा परंपरागत मतदारसंघ असल्याने काँग्रेसने असा दावा करू नये, अशी भूमिका घेतली आहे. ठाकरे गटाकडून विशाल बरबटे इच्छुक आहेत. यामुळे महाविकास आघाडीत शीतयुद्ध सुरू झाले आहे. जातीय समीकरणांच्या दृष्टीने, रामटेकमध्ये कुणबी, नवबौद्ध, दलित आणि आदिवासी मतदारांचे प्रमाण निर्णायक आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article