Published on
:
20 Nov 2024, 3:12 pm
Updated on
:
20 Nov 2024, 3:12 pm
कन्नड : रामनगर गाववासियांनी ८ नोहेंबर रोजी निवडणुकांवर बहिष्कार टाकत असल्याचा फलक लावून विरोध केला होता. त्याच अनुषंगाने आज रामनगर गावातील लोकांनी एकही मतदान केले नाही. अनेक अधिकारी आले आणि गेले परुंतु गावातील लोक मागण्यांवर कायम राहिले. त्यामुळे शेवटी मतदानाचा वेळ संपला आणि मत पेट्या रिकाम्या परत गेल्या.कन्नड तालुक्यातील रामनगर हे गाव वसून २६ वर्ष उलटली, परंतू गाव आजही विविध सुविधांपासून वंचित असल्याने संपूर्ण गावाने विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला.
याबाबत अधिक माहिती अशी की, अंजना पळशी प्रकल्पासाठी वाडी पळशी हे गाव भूसंपादित करण्यात आले. वाडी या गावाचे नाव रामनगर करण्यात आले आणि रामनगर गावाचे पुनर्वसन नगर रचनेच्या नियमाप्रमाणे करण्यात आले. शासनाने नगररचनेप्रमाणे २५ हेक्टर ६६ आर भूखंड या पुनर्वसित गावासाठी लागणार असल्याचा नकाशा तयार केला. कार्यकारी लघु पाटबंधारे अभियंता श्रेणी नंबर एकने १९९४ ला लेआउट केले. १९९८ मध्ये रामनगर गाव पुनर्वसित करण्यात आले आहे.
नगर रचनेच्या नकाशामध्ये या गावासाठी शासनाने दफनभूमी, स्मशानभूमी, प्लॉट लाईन, फुल रस्ते रोड यासारख्या बऱ्याच गोष्टी शासनाने कागदावर दाखवले आहे. परंतु प्रत्यक्षात गावाला या सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. या गावातील मागण्या पूर्ण होत नसल्याने गावकऱ्यांनी निवडणूकीवर बहिष्कार टाकला. वारंवार चकरा मारून, वारंवार तक्रारी करून सुद्धा शासनाने पुनर्वसित गावाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.