इर्विनमध्ये होणार 50 खाटांची आयसीयू इमारत:बांधकामालाही सुरुवात; आहार विभाग, स्टोरेज इमारत केली जमीनदोस्त‎

4 hours ago 1
अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेता, या ठिकाणी आयसीयू बेडची संख्या वाढवण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. रुग्णालय प्रशासनाकडून यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. त्यामुळे इर्विन येथे ५० खाटांची आयसीयू इमारत मंजूर झाली असून, आता या इमारतीच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी रुग्णालय परिसरातील कर्मचाऱ्यांचे जुने निवासस्थान, आहार विभाग तसेच स्टोरेज रूम पाडले आहेत. या जागेवर ही स्वतंत्र इमारत उभी होत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात गंभीर रुग्णांना आयसीयूची गरज असते. परंतु, येथे केवळ सहा आयसीयू बेड उपलब्ध आहेत. परिणामी रुग्णांना नागपूर रेफर करण्यात येते. यामध्ये उपचाराला वेळ लागतो. अशात अनेक रुग्णांना आपले प्राणही गमवावे लागले. त्यामुळे इर्विन रुग्णालयातच रुग्णांना उपचार मिळावे, याकरिता आयसीयू बेडची संख्या वाढवण्याची मागणी होत होती. या मागणीच्या अनुषंगाने रुग्णालय प्रशासनाने आयसीयू बेड वाढवण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता. हा प्रस्ताव मंजूर झाल्याने आता रुग्णालय परिसरात ५० खाटांची आयसीयू इमारत तयार करण्यात येत आहे. या आयसीयू इमारतीमध्ये प्रत्येक आजारासाठीचे वेगवेगळे आयसीयू विभाग राहणार आहेत. या आयसीयू इमारतीच्या बांधकामासाठी रुग्णालय परिसरातील जुने निवासस्थान, आहार विभाग, तसेच स्टोरेज रूमची इमारत जमीनदोस्त करण्यात आली आहे. डोळ्यांच्या शस्त्रक्रियांना १५ दिवसांपासून ब्रेक आयसीयू इमारतीचे बांधकाम हे आय ओटी विभागाजवळच होत आहे. त्यामुळे येथील जमीनदोस्त केलेल्या इमारतींची धूळ ही आय ओटीमध्ये जात असल्याने मागील १५ दिवसांपासून डोळ्यांच्या शस्त्रक्रिया बंद केल्या आहेत. रुग्णालयात दररोज सरासरी २० रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येतात. इर्विन रुग्णालय परिसरात ५० खाटांची इमारत उभी करण्यात येत आहे. त्याचे काम सुरू झाले आहे ^आयसीयू इमारतीसाठी इतर वापरात नसलेल्या जागेवरील इमारती या जमीनदोस्त केल्या आहेत. त्यामुळे येथे उडणाऱ्या धुळीमुळे आय ओटी विभाग बंद ठेवण्यात आला आहे. लवकरच डोळ्यांच्या शस्त्रक्रिया पुन्हा सुरू होतील. -डॉ. दिलीप सौंदळे, जिल्हा शल्यचिकित्सक.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article