रामेश्वर भगवान आरती वर्धापनदिन आज स्पर्धा:शिवभक्त परिवाराच्या वतीने आयोजित

2 hours ago 1
येथील श्री रामेश्वर भगवान नित्य आरती सोहळयाच्या आठव्या वर्धापनदिनानिमित्त शिवभक्त परिवाराच्या वतीने मुलांमध्ये धार्मिक संस्कार रुजावे म्हणून गणपतीच्या आरतीतील कोणत्याही एका कडव्याचा अर्थ लिहणे स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती आरतीचे सेवेकरी यांनी दिली आहे. शनिवारी (दि. २८) सकाळी ८ ते ११ ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भाविकांना पेन व कागद जागेवर मिळेल. १० मिनिटांत, सुंदर अक्षर, लिहणाऱ्या प्रथम ३, द्वितीय १० स्पर्धकांना तांब्याचे ताट बक्षीस व उतेजनार्थ बक्षीसे देण्यात येणार आहे. स्पर्धेत सर्व विद्यार्थी तरुण, ज्येष्ठ पुरुष व महिला भाविक सहभागी होऊ शकतील. बक्षीस वितरण दि. ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ७:३५ वाजता आरती सोहळ्यानंतर होईल. स्पर्धा व बक्षीस वितरण श्रीं रामेश्वर मंदिर भक्त निवास येथे होईल. स्पर्धेत व आरती सोहळ्यामध्ये जास्तीत जास्त भाविकांनी सहभाग नोंदवावा.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article