राष्ट्रसंतांचा पुण्यतिथी महोत्सव आजपासून; भक्तांची मांदियाळी:21 ला मौन श्रद्धांजली, सात दिवस विविध कार्यक्रम

3 days ago 3
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवाला मंगळवारपासून (दि. १५) प्रारंभ होत आहे. त्यानिमित्त गुरुकुंज आश्रमात देशभरातील गुरुदेव भक्तांची मांदियाळी अवतरणार आहे. अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाद्वारे पुण्यतिथी महोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सात दिवसीय महोत्सवात विविध दैनंदिन कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. पुण्यतिथी महोत्सवामधील सर्वात भावस्पर्शी कार्यक्रम मौन श्रद्धांजलीचा असून सोमवार, २१ ऑक्टोबरला होत आहे. मंगळवारी पहाटे ४ वाजता तीर्थस्थापना, चरण पादुका व महासमाधी पूजनाने या महोत्सवाची सुरुवात होणार असून, सामुदायिक ध्यानानंतर गुरुकुंज आश्रमात राष्ट्रसंतांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. रात्री वरखेड येथील महिला भजन मंडळाचा खंजिरी भजनाचा कार्यक्रम तसेच पंकज महल्ले व सचिन काळे यांचे कीर्तन होणार आहे. गुरुवारी (दि. १७) सामुदायिक ध्यानावर विलास साबळे यांचे चिंतन, सकाळी ८ वाजता नीळकंठ हळदे यांचे ग्रामगीता प्रवचन साडे अकरा वाजता धनश्री खंडारे यांची अभंगवाणी, दुपारी १२ वाजता पुष्पा बोंडे यांच्या अध्यक्षतेखाली महिला संमेलन आयोजित केले असून, या संमेलनाच्या मार्गदर्शक विजया मारोतकर व प्रमुख पाहुणे म्हणून कल्पना दिवे (पं. स. सभापती), वैशाली धुमोणे (सरपंच, गुरुदेवनगर) तसेच डॉ. लक्ष्मी जवंजाळ, डॉ. वसुंधरा बोंडे, डॉ. नयना कडू, गौरी देशमुख, संगीता शिंदे, माधवी ढवळे यांची उपस्थिती राहणार आहे. सायंकाळी ६ वाजता सामुदायिक प्रार्थनेवर पुष्पा बोंडे यांचे चिंतन, ७ वाजता क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले भजन मंडळाचे खंजिरी भजन, साडेआठ वाजता ज्योती धनाडे यांचे कीर्तन, साडेनऊ वाजता नारायणदास पडोळे यांचे कीर्तन होईल. सोमवारी समर्थ आडकोजी महाराज संस्थान वरखेड, जन्मभूमी यावली, तपोभूमी गोंदोडा येथील पालख्यांचे स्वागत व पूजन दुपारी साडे तीन वाजेपासून मौन श्रद्धांजली सर्व संत स्मृतिमानवता दिन सर्वधर्मीय प्रार्थना व सामुदायिक प्रार्थना, त्यानंतर विश्व शांतीसाठी महामंत्र सामुदायिक प्रार्थना आदी कार्यक्रम होतील. मंगळवारी (दि. २२) सकाळी पावणे सात वाजता दिंडी व पालखी प्रदक्षिणा, १० वाजता गोपालकाला व त्यावरील सचिन पवार यांचे कीर्तन होईल. दुपारी ३ वाजता एचव्हीपीएमचे व्यायाम संमेलन व व्यायाम प्रात्यक्षिकांचे सादरीकरण होईल. रात्री साडेसात वाजता खंजिरी भजन संध्येने पुण्यतिथी महोत्सवाचा समारोप होईल. मोठ्या संख्येने गुरुदेव भक्तांनी कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाद्वारे करण्यात आले आहे. असे आहेत दैनंदिन कार्यक्रम : सात दिवसीय महोत्सवात दररोज सामुदायिक ध्यान, सामुदायिक प्रार्थना व त्यावरील चिंतन, ग्रामसफाई, प्रवचन, कीर्तन संमेलन (गुरुकुंज वारी), भजनसंध्या, खंजिरी भजन, योगासन शिबिर, वक्तृत्व स्पर्धा, ग्राम गीताचार्य पदवीदान समारंभ, कार्यकर्ता संमेलन, महिला मेळावा, अभंग गायन तसेच सामुदायिक प्रार्थना विश्वशांतीचा महामंत्र या विषयावरील परिसंवादात विदेशी भाविक सहभागी होणार आहे. सामुदायिक ध्यानावर होईल यांचे चिंतन पुण्यतिथी महोत्सवा दरम्यान सामुदायिक ध्यानावर बुधवारी (दि. १६) डॉ. सूर्यप्रकाश जयस्वाल, गुरुवारी विलास साबळे, शुक्रवारी संदीप गिंछे, शनिवारी प्रशांत ठाकरे, रविवारी कैलास महाराज चव्हाण, सोमवारी डॉ. कमलेश पटेल व मंगळवारी (दि. २२) प्रकाश वाघ हे चिंतन करतील.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article