राष्ट्रीय पोषण अभियानात हिंगोली जिल्हा राज्यात पहिला:एक महिन्यात 1197 अंगणवाड्यांतून राबविलेल्या उपक्रमांच्या 18 लाख नोंदी

3 hours ago 1
राज्यात राष्ट्रीय पोषण अभियानांतर्गत हिंगोली जिल्हयाने 1197 अंगणवाड्यांमधून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून तब्बल 18 लाख नोंदी घेत राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. भंडारा जिल्हा दुसऱ्या तर अमरावती जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. राज्यात महिला बाल कल्याण विभागाच्या वतीने अंगणवाड्यांमधून सप्टेंबर महिन्यात पोषण माह राबविण्यात आला. यामध्ये 1 लाख अंगणवाड्यांमधून विविध उपक्रम राबवून त्याच्या नोंदी घेण्याच्या सुचना आयुक्त कार्यालयाने दिल्या होत्या. या उपक्रमात अंगणवाडीतील बालकांच्या आरोग्य सोबतच गरोदर व स्तनदामातांसाठी मार्गदर्शन उपक्रमांचा समावेश होता. दरम्यान, हिंगोली जिल्हयात जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्यकार्यकारी अधिकारी गणेश वाघ तसेच बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी यांनी सहा प्रकल्पांमधील अंगणवाड्यांमधून उपक्रम राबविण्यास सुरवात केली आहे. महिला बाल कल्याण विभागाच्या आयुक्त कार्यालयाने ठरवून दिलेल्या उपक्रमांसोबतच इतर नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. या उपक्रमांची माहिती व छायाचित्र देखील ऑनलाईन अपलोड केले जात आहे. हिंगोली जिल्हयातील 1197 अंगणवाड्यामधून 18 लाख ऑनलाईन नोंदी घेण्यात आल्या आहेत. राज्यात सर्वात जास्त उपक्रम व नोंदी घेत हिंगोली जिल्ह्याने राज्यात पहिला क्रमांक मिळविला आहे. तर भंडारा जिल्ह्यातील 1497 अंगणवाड्यांतून 9.75 लाख नोंदी घेण्यात आल्या असून या जिल्हयाने दुसरा तर अमरावती जिल्हयातील 3189 अंगणवाड्यांतून 20 लाख नोंदी घेतल्या गेल्या असून त्यांची दररोजच्या नोंदीची सरासरी कमी आल्यामुळे त्यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article