जुने लँडलाईन टेलिफोन इतिहासजमा होणार; बीएसएनएल विणतेय फायबरचे जाळे

2 hours ago 1
पुढारी वृत्तसेवा

Published on

01 Oct 2024, 6:58 am

Updated on

01 Oct 2024, 6:58 am

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : संवाद साधण्याचे एकमेव साधन म्हणने लैंडलाईन फोन, एखाद्याच्या घरात फोनची घंटी खणाणली की घरातील सदस्यांना कोणाचा फोन आला याची उत्सुकता राहायची, ही उत्सुकता मोबाईलच्या आगमनानंतर कमी झाली आहे. आता लैंडलाईन इतिहास जमा होणार असून वाचा विस्तार फायबरमध्ये होत आहे त्यामुळेच बीएसएनएल जाता फायबरचे जाळे घट्ट विणत आहे.

सन २००० च्या काळात जिल्ह्यात सुमारे साडेचार ते पाच लाखांच्या घरात लैंडलाईन फोन होते. आजघडीला ग्रामीण भागातील पूर्ण सेवा बंद करण्यात आली असून शहरात केवळ अडीच हजार लैंडलाईन खणखणत असल्याची माहिती बीएसएनलचे सहायक महाप्रबंधक राजेंद्र कोळपकर यांनी दिली.

१९९८ च्या काळात मोबाईलचे आगमन झाले. तो वापरण्यासाठी आणि कुठेही घेऊन जातांना हाताळण्यास सहज सोपे असल्याने हळू हळू लंडलाईनची मागणी कमी होत होती. त्या दरम्यानही बीएसएनलचे लँडलाईन तग धरून होते. परंतु मोबाईल पाठोपाठ फायबर इंटरनेटचे आगमन होताच मात्र लँडलाईनची मागणी कमी कमी होत गेली.

बीएसएनएलचे सन २००० मध्ये शहरात साडेतीन लाख ग्राहक होते. त्यात घट होऊन २०१० ते २०२० पर्यंत ही संख्या १ लाखांवर आली तर २०२४ मध्ये ही संख्या २ हजार ४१९ वर आली आहे. आजघडली केवळ शासकीय कार्यालये आणि काही खासगी ठिकाणी लैंडलाईन आहेत, तेही कॉपरचे एफटीटीएच (फायबर टू होम) है लवकरच अपग्रेड होणार आहेत.

कॉपर टू फायबर

बाजारात विविध कंपन्याचे मोवाईल आणि इंटरनेटचे आगमन झाले. इंटरनेट आणि त्याची स्पीडची मागणी वाढली. त्या दरम्यान मात्र बीएसएनएल आहे त्याच कॉपर इन्फ्रास्ट्रक्चरवर इंटरनेट सेवा देत होते. ती सेवा ग्राहकांपर्यंत जातांना दम तोडत असल्याने अनेकांनी खासगी कंपन्याकडे मोर्चा वळवला. त्यामुळे काही काळ बीएसएनएल डबघाईला आले होते, परंतु पुन्हा उभारी घेत बीए‌सएनएलने कॉपर टू फायबर असा प्रवास सुरू केल्यानंतर मात्र लैंडलाईनलाच जोडून स्पीडने इंटरनेट सेवा देण्यास सुरूवात करत बीएसएनएलने पुन्हा बाजारात पाय रोवले. आजमितीस ११५०० पेक्षा अधिक भारत फायबरची जोडणी झाली, असून दिवसागणिक त्यात बाळ होत आहे. लैंडलाईनचा जुनाच नंबर भारत फायबर मध्ये अपग्रेड करून देण्यावर बीएसएनएल भर देत आहे.

खासगी कंपन्यांनी भग्ररी

१९९५ ते २०१५ पर्यंत खासगी इंटरनेट कंपन्या बीएसएनएलच्या इन्फ्रास्ट्रक्चरवर आपली सेवा देत पूर्ण बाजार आपल्या हाती घेतला, यावेळी बीएसएनएलचे जाळे असूनही केवळ लालफितीमुळे ते त्या दरम्यान भरारी घेऊ शकले नाही. २०१५ नंतर मात्र खासगी कंपन्यांनी आपले स्वतःचे जाळे निर्माण केले. नुकतेच बीएसएनएलने कमी दामात ४ जी आणि ५ जी इंटरनेट सेवेसाठी कंबर कसल्याने खासगी कंपन्याची त्रेधातिरपट उडाली आहे.

अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होईपर्यंत टेलिफोन मिळणे जिकरीचे काम होते. अनेक वर्ष वेटींग रहावे लागत असे. खासदारांना आपल्या कोट्यातून टेलिफोन देण्याची मुभा होती. शासकीय कार्यालये, पोलिस, आं प्रशामक दल, हॉस्पिटल यांना प्राधान्य मिळत असे. परंतु राम नाईक यां च्याकडे हे खाते आल्यानंतर त्यांनी या क्षेत्रात क्रांती केली आणि घरोघरी टेलिफोनची बेल बाजू लागली. याशिवाय एसटीडी, पीसीओची व्यवस्था अनेक ठिकाणी झाल्याने संदेश पोहचविणे सहजशक्य झाले अर्थात मोबाईलमुळे तर आता सर्व जग जवळ आले आहे.

इतर कंपन्यांचे लँडलाईन गायब

बीएसएनएलच्या नंतर एअरटेल, जीओ, झुजेस व इतर खासगी कंपन्यांनीही लैंडलाईन फोनची सेवा सुरू केली होती, कॉडलेस असो की इतर अपडेट लँडलाईन सेवा सुरू केली होती, आजघडीला या सर्वच कंपन्यांनी आपली लँडलाईन सेवा बंद केली असून बाजारात केवळ बीएसएलल भारत फायबरच्या माध्यमातून आजही पाय रोवून प्रगतिपथावर आहे अशी माहिती बीएसएनएल सहायक महाप्रबंधक (मार्केटिंग) राजेंद्र कोळपकर यांनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article