राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहरात ५ ठिकाणी संचलन व शस्त्र पूजन:घोष पथकातील विविध वाद्यांच्या तालावर संचालन शिस्तबद्धपणे मार्गस्थ

5 days ago 3
विजयादशमी उत्सवा निमित्त अहिल्यानगर शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने शहरातील ५ विविध भागांमध्ये संचलन व शस्त्र पूजन झाले. यात सहभागी असलेल्या संघाच्या घोष पथकातील विविध वाद्यांच्या तालावर हे संचालन शिस्तबद्धपणे मार्गस्थ झाले. शहरात आगरकरमळा भागात सकळी साडेआठ वाजता, बोल्हेगाव भागात सकाळी ७ वाजता, मध्य नगर भागात सकाळी साडेसात वाजता, भिंगार व पाईप लाईन रोड भागात दुपारी साडेतीन सघोष पथसंचालन झाले. आगरकर मळा येथे संचलनानंतर झालेल्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते पुण्याचे विधीज्ञ योगेश्वर घोगले यांनी मार्गदर्शन केले, तर प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ तुरुंग अधिकारी चंद्रकांत जठार उपस्थित होते. बोल्हेगाव येथे झालेल्या उत्सवात ओम शिवगोरक्ष योगी अस्थानचे नाथभक्त अशोकभाऊ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर संघाचे नगर दक्षिण जिल्हा सहकार्य दिनेश करंडे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. भिंगार येथे छावणी परिषदेच्या बाबासाहेब आंबेडकर प्रशालेचे मुख्याध्यापक संजय शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर संघाचे नगर दक्षिण जिल्हा प्रचारक दीपक पारेकर प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित. दादा चौधरी विद्यालय येथे संघाचे नगर दक्षिण जिल्हा सेवा प्रमुख डॉ. कृष्णा देहाडराय यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केले. लेखक व दिग्दर्शक अभिजीत दळवी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. गंगा उद्यान येथे झालेल्या कार्यक्रमात आयकर कायदे तज्ञ सीए. प्रसाद भंडारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर विद्या भारतीचे प्रांत सहमंत्री दादासाहेब काजळे यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article