राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त त्रिसूत्री उपक्रम राबविणार:मार्डीत दसऱ्यानिमित्त‎शानदार पथसंचलन‎

4 days ago 3
शंभर वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आतापर्यंत कोट्यवधी स्वयंसेवक निर्माण केले असून भारतीय संस्कृती, धर्म आणि समाजाच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेल्या आर.एस.एस.चे २०२४- २५ हे शताब्दी वर्ष असून त्यानिमित्त कुटुंब प्रबोधन, समरसता व पर्यावरण संतुलन हा त्रिसूत्री कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रांत सह तरुण व्यवसायिक प्रमुख चंद्रशेखर पाठक यांनी सांगितले. विजया दशमीनिमित्त उत्तर सोलापूर तालुक्याचे पथसंचलन रविवारी (दि.१३) मार्डी येथे झाले. त्यावेळी ते बोलत होते. स्थापत्य अभियंता संभाजी पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तालुका संघचालक चंद्रकांत गडेकर यावेळी उपस्थित होते. मार्डी गावातून संघाच्या स्वयंसेवकांचे शानदार शिस्तबद्ध पथसंचलन करण्यात आले. त्यानंतर झालेल्या बौद्धिक कार्यक्रमात ते बोलत होते. भारतातील जातीव्यवस्था मोडीत काढून सगळे हिंदू समान आहेत, हा विचार संघाने रुजविला असल्याचे सांगून पाठक म्हणाले, संघ शंभराव्या वर्षात पदार्पण करीत असताना आता प्रत्येक हिंदूची जबाबदारी वाढली आहे.एकाच विचाराने,ध्येयाने व एकाच दिशेने चालणारी संघटना १०० वर्षे पूर्ण करते, हा जागतिक इतिहास आहे. आता भ्रम निर्माण करणा-या शक्ती आहेत. आता दिसणारे रावण नाहीत. तर वैचारिक रावण उदयाला आले आहेत. त्यामुळे प्रत्येक हिंदु कुटुंबाचे प्रबोधन, एकमेकांविषयी समरसता भाव व पर्यावरणाचे रक्षण या त्रिसूत्रीचा अवलंब आता करावा लागणार आहे. मार्डी शाखा प्रमुख सूरज इनामदार यांनी पद्य म्हटले. रुपेश मठे याने संस्कृत सुभाषित म्हटले. उदय काळे यांनी आमृतवचन म्हटले. प्रमोद इनामदार याने प्रार्थना म्हटली.मार्डीसह डोणगाव, कारंबा, वडाळा, बाणेगाव,सोलापूर शहरातील स्वयंसेवक उपस्थित होते. मानवतेसाठी झटणारी संघटना संभाजी पाटील म्हणाले, संघ ही केवळ हिंदूंची संघटना नाही तर मानवतेचा दूरदृष्टीचा विचार घेऊन कार्य करणारी धर्मनिरपेक्षतावादी संघटना आहे. उद्दिष्टपूर्तीसाठी काम करीत असताना त्याचे परिणाम काय होतील, याचा विचार करुन युवकांनी अतिआत्मविश्वासपूर्वक काम न करता आत्मविश्वासपूर्वक काम करावे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article