Indian Railways Fines contractor: भारतीय रेल्वेने रोज कोट्यवधी प्रवासी प्रवास करतात. रेल्वेकडून प्रवाशांच्या सोयी, सुविधांची काळजी घेतली जाते. रेल्वेने प्रवाशांच्या सुविधांकडे लक्ष न देणाऱ्या ठेकेदारांना दंड करणे सुरु केले आहे. रेल्वेला एकूण 5.60 कोटी रुपये दंड मिळणार आहे. भारतीय रेल्वेकडून होणाऱ्या या धडक कारवाईमुळे प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधांमध्ये दिवसंदिवस सुधारणा होत आहे.
असा झाला दंड
ट्रेनमध्ये प्रवास करताना खराब जेवण, कोच टॉयलेटमध्ये घाण असणे, पाणी नसणे, खराब मोबाइल चार्जिंग, खराब बेडरोल, खराब एसी, खराब लाईट अशा तक्रारी प्रवाशांकडून येत आहे. त्यानंतर भारतीय रेल्वेकडून ठेकेदारांवर कारवाई केली जात आहे. प्रवाशांनी सोशल मीडियावर फोटो, व्हिडिओ टाकले आहे. तसेच रेल मदद या बेबसाईट आणि अँपवर तक्रारी केल्या आहे. त्या तक्रारींची दखल घेत रेल्वेने ठेकेदारांना 4 कोटी 40 लाख रुपये दंड करण्यात आला. तसेच एक कोटी रुपयांचा दंड ऑनबोर्ड हाउस कीपिंग करणाऱ्या ठेकेदारांना केला गेला आहे. म्हणजेच मागील सहा महिन्यात ठेकेदारांना एकूण 5.60 कोटी रुपये दंड केला आहे.
रेल्वेकडून त्वरित कारवाई
रेल्वेच्या सेकंड एसीमधून एक महिला प्रवासी प्रवास करत होती. त्यावेळी तिला मिळालेले बेडरोल खराब होते. त्याबाबत तिने अटेंडेंटकडे तक्रार केली. त्या तक्रारीनंतरही त्याने बेडरोल बदलून दिला नाही. मग तिने रेल मददमध्ये तक्रार केली. त्यानंतर त्या ठेकेदारास त्वरीत दंड करण्यात आला.
हे सुद्धा वाचा
कॅटरिंग शिवाय ट्रेनमध्ये कोच किंवा टॉयलेट घाण असणे, खराब स्विच, खराब एसी, स्टेशनवरील लिफ्ट खराब असणे, एस्केलेटर, लाइट खराब याबाबत ठेकेदारांना 10,000 ते 20,000 रुपये दंड केला जातो. रेल्वे प्रवासी त्यासंदर्भातील तक्रार नोंदवली किंवा फोटो शेअर केले तर रेल्वे अधिकारी ठेकेदारास दंड करतात. तसेच वारंवार एकच तक्रार आली तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना गंभीर इशारा दिला जातो. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी तक्रार आल्यावर त्वरित कारवाई करत असतात.