रेल्वे प्रशासनाने बोगद्याच्या समस्या सोडवाव्यात:अशोक कामटे सामाजिक संघटना‎

1 hour ago 1
मिरज रोड ३२ बी रेल्वे ब्रीजवर पूर्वी असलेले हाइट गेज बसवावेत. ब्रीजच्या नादुरुस्तीमुळे येथे वाहने जाताना अडचण निर्माण होत असल्याने ते दुरुस्त व्हावे, अशी मागणी शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय संघटनेने रेल्वे विभागाचे विभागीय व्यवस्थापक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. मागील १० दिवसांपूर्वी अज्ञात अवजड वाहनाने धडक दिल्याने येथील हाईट गेज नादुरुस्त व निकामी झाल्याने काढून टाकले आहेत. त्यामुळे सोलापूर, जत, पंढरपूर या भागातून अवजड वाहने मिरजकडे जाण्यासाठी वासूद चौकातून मिरज रोडने रेल्वे पुलाखालून जाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे वाहनांची कोंडी या ब्रीजखाली सातत्याने होत आहे. त्यासाठी प्रतिबंध म्हणून पूर्वस्थितीत एचडीएफसी बँकेची मिरज रोडवर असलेले हाईट गेज रेल्वे इंजिनिअरिंग विभाग पंढरपूर यांनी तत्काळ दुरुस्ती करून बसवावेत. या ब्रीजखाली सातत्याने पाणी साठत असल्याने येथे चिखल, गाळ मोठ्या प्रमाणात साचत आहे. या रेल्वे रूळबांधणीपासून लागलेले ग्रहन अद्याप संपत नाही. परिणामी अनेक दुचाकी व इतर वाहने घसरून स्लीप होण्यामुळे अपघात दररोज होत आहे. तरी रेल्वे प्रशासनाने या भागात येणारे पाणी बंद करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात. रेल्वेने संबंधित काम पूर्ण करून वाहनधारकांची समस्या सोडवावी. अनेक जण जायबंदी रेल्वे प्रशासनास संबंधित समस्यांविषयी वारंवार पत्रव्यवहार, संपर्क साधूनही गांभीर्याने येथील रेल्वे पुलाखालील दररोज घडणाऱ्या अपघातांमुळे अनेक जायबंदी झाले. हाइट गेजविषयी रेल्वे इंजिनिअरिंग विभाग दखल घेणार नसेल संघटनेच्या वतीने रेल रोको आंदोलन करू. -नीलकंठ शिंदे, अध्यक्ष, शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटना सांगोला.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article