लाडकी बहीण योजनेत बांगलादेशी महिलांची घुसखोरी झालीच नसल्याचे स्पष्ट झाले.Pudhari File Photo
Published on
:
24 Jan 2025, 1:30 am
Updated on
:
24 Jan 2025, 1:30 am
मुंबई : अभिनेता सैफ अली खानवर चाकूहल्ला करणारा बांगलादेशी पैलवान असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मुंबईसह राज्यात बांगलादेशही घुसखोर हुडकून काढण्याची मोहीमच पोलिसांनी हाती घेतली असून, गुरुवारी मुंबईच्या नागपाड्यात पाच बांगलादेशी नागरिकासह सहाजणांना पोलिसांनी अटक केली. त्यात तीन महिला, दोन तरुण आणि बांगलादेशी नागरिकांना लॉजिस्टिक मदत करणार्या एका भारतीय नागरिकाचा समावेश आहे.
महादेव जीवलाल यादव, बिस्टी जलाल फकीर समफुल शेख, बिस्टी असुल अलीम अख्तर गुलाम, उर्मिला अख्तर मुल्ला खातून व अन्य दोन पुरुष बांगलादेशी नागरिकांचा समावेश आहे. अटकेनंतर या सर्वांना किल्ला न्यायालयाने शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. ही अटक रोेखण्यासाठी या तिन्ही महिलांनी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतला होता आणि त्यामुळे त्या बांगलादेशी नसून भारतीय नागरिक असल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी केला. मात्र या तिन्ही महिलांनी अशा कुठल्याही योजनेचा लाभ घेतल्याचे तपासात आढळलेले नाही, असे प्रभारी पोलीस निरीक्षक मिलिंद काठे यांनी सांगितले. पुण्यातील स्वारगेट परिसरातील महर्षीनगरमधून बांगला देशी नागरिकाला गुरुवारी अटक करण्यात आली.