Sanjay Raut connected Third Deputy Chief Minister : संजय राऊत यांची तोफ दररोज धडाडत आहे. त्यांनी आता शिंदे सेनेवर जोरदार दारुगोळा डागला आहे. या धडाडणाऱ्या तोफेतून रोज नवनवीन बॉम्ब गोळे डागण्यात येत असल्याने राज्याच्या राजकारणात मोठा भूंकपाचे संकेत मिळत आहेत.
संजय राऊतांचा नवीन बॉम्ब
उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची तोफ दिवसागणिक आग ओकत आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांनी शिंदे सेनाच फुटीवर असल्याचा दावा केल्याने एकच खळबळ उडाली आहे. दावोस दौऱ्यात महाराष्ट्रीतील गुंतवणुकीची चर्चा न होता महायुतीमधील भूकंपाची चर्चा अधिक रंगली. दुसरीकडे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे गटाला भगदाड पाडण्याचा दावा केला आहे. तर आज संजय राऊत यांनी सकाळीच मोठा बॉम्ब टाकला. राज्याला नवीन तिसरा मुख्यमंत्री मिळणार असल्याचा दावा करत त्यांनी खळबळ उडवून दिली आहे. काय म्हणाले संजय राऊत?
बातमी अपडेट होत आहे…