कोकणात ठाकरे गटाला धक्क्यांवर धक्के:नीलेश राणे यांनी महाविकास आघाडीचा 1 नगरसेवक फोडत भाजपचा नगराध्यक्ष निवडून आणला
5 hours ago
1
कोकणात शिवसेनेच्या ठाकरे गटाला पर्यायाने महाविकास आघाडीला जबर झटका बसला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे आमदार नीलेश राणे यांनी शुक्रवारी कुडाळ नगरपंचायतीच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा 1 नगरसेवक फोडून भाजपच्या प्राजक्त बांदेकर यांची नगराध्यक्षपदी निवडून आणले आहे. या निवडणुकीत मविआच्या उमेदवाराचा एवघ्या 1 मताने पराभव झाला. कुडाळ नगपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या प्राजक्ता बांदेकर, तर महाविकास आघाडीकडून सई काळप मैदानात होत्या. त्यात महाविकास आघाडीकडे 9, तर महायुतीकडे 8 मते होती. त्यामुळे महाविकास आघाडीचा नगराध्यक्ष होणार हे जवळपास स्पष्ट होते. पण आमदार नीलेश राणे यांनी प्रत्यक्ष निवडणुकीत महाविकास आघाडीचा 1 नगरसेवक फोडण्यात यश मिळवले. त्यामुळे भाजपच्या प्राजक्ता बांदेकर 9 मते मिळवत नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या. तर सई काळप यांना आपल्याच नगरसेवकाने दगा दिल्यामुले एका मताने पराभव सहन करावा लागला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात लवकरच जिल्हा परिषद व नगरपालिकेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत कुडाळच्या विजयाचा महायुतीला मोठा फायदा होणार असल्याचा दावा केला जात आहे. आमदार नीलेश राणे यांनी आगामी सर्वच निवडणुकांत महायुतीच्या माध्यमातून आम्ही विजयश्री खेचून आणू असा विश्वास व्यक्त केला. मागील अडीच वर्षांपासून कुडाळ शहराचा विकास रखडला होता. त्यामुळे येथील महाविकास आघाडीचा एक नगरसेवक फुटला. आता खऱ्या अर्थाने कुडाळचा विकास होईल, असे ते म्हणाले. ठाकरे गटाच्या वैभव नाईकांना सलग दुसरा धक्का गत विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार वैभव यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. त्यामुळे कुडाळ नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांनी चांगलाच जोर लावला होता. पण आमदार नीलेश राणे यांनी ऐनवेळी महाविकास आघाडीचा नगरसेवक फोडत त्यांना दुसरा जबर झटका दिला. कोकणात ठाकरे गटाला धक्क्यांवर धक्के विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या ठाकरे गटाचा कोकणातील 2 जागांवर पराभव झाला होता. रायगडमधून अनंग गिते यांना पराभव सहन करावा लागला, तर रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात विनायक राऊत हे पराभूत झाले. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत वैभव नाईक व राजन साळवी या दोघांना पराभव स्वीकारावा लागला. वैभव नाईक यांना नीलेश राणे यांनी अस्मान दाखवले, तर राजन साळवी यांना पराभूत करत किरण सामंत विधानसभेत पोहोचले. कोकणातून ठाकरे गटाचे केवळ भास्कर जाधव विजयी झालेत.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)