Indian Republic Day 2025 |प्रजासत्ताक दिनाच्या परेमध्ये 'इंडोनेशियन मार्चिंग आणि बँड पथक'Pudhari
Published on
:
24 Jan 2025, 12:46 pm
Updated on
:
24 Jan 2025, 12:46 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क: Indian Republic Day 2025 |भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो हे भारतात दाखल झाले आहे. याच पार्श्वभूमीवर रविवार 26 जानेवारीच्या परेडमध्ये पहिल्यांदाच इंडोनेशियन 'मार्चिंग आणि बँड पथक' सहभागी होणार आहे. भारतीय परेडमध्ये परदेशी पथक दाखल होण्याची ही पहिलीच वेळ असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात दिली आहे.
मजबूत लष्करी आणि सांस्कृतिक सहकार्याचे प्रतीक
संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १६२ सदस्यांचा मार्चिंग दल आणि इंडोनेशियातील १९० सदस्यांचा बँड देखील प्रजासत्ताक दिनाच्या परेडचा भाग असेल. दुसऱ्या देशाच्या राष्ट्रीय परेडमध्ये इंडोनेशियन पथक सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. हे दोन्ही देशांमधील मजबूत लष्करी आणि सांस्कृतिक सहकार्याचे प्रतीक आहे.
The Indonesian National Armed Forces (TNI) showcased an inspiring display of unity, discipline, and national pride during the #RepublicDay2025 Parade rehearsal. The 152-member Marching Contingent, representing all branches of the TNI, demonstrated precision and military readiness… pic.twitter.com/22H1FOTQjF
— Ministry of Defence, Government of India (@SpokespersonMoD) January 23, 2025राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो भारतात येणारे चौथे इंडोनेशियन
प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात सहभागी होणारे सुबियांतो हे चौथे इंडोनेशियन राष्ट्रपती असतील. इंडोनेशियाचे अध्यक्ष सुबियांतो यांच्या भेटीदरम्यान, दोन्ही देशांमधील अनेक क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी करारांवर स्वाक्षरी होण्याची अपेक्षा आहे. प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाला उपस्थित राहणारे ते चौथे इंडोनेशियन राष्ट्रपती असतील. १९५० मध्ये भारताच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात इंडोनेशियाचे पहिले राष्ट्रपती सुकर्णो प्रमुख पाहुणे होते.
मागील काही वर्षात भारत-इंडोनेशिया संबंध सुधारले
गेल्या काही वर्षांत भारत-इंडोनेशिया संबंध वाढले आहेत. २०१८ मध्ये पंतप्रधान मोदी इंडोनेशियाला भेट दिली, त्या काळात भारत-इंडोनेशिया संबंध व्यापक धोरणात्मक भागीदारीपर्यंत पोहोचले. प्रबोवो सुबियांतो यांनी यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींशीही चर्चा केली आहे. इंडोनेशियामध्ये राष्ट्रपती म्हणून निवड झाल्यानंतर सुबियांतो यांनी पंतप्रधान मोदींना फोन केला होता. या काळात, भारत आणि इंडोनेशियामधील संस्कृती संबंध पुढे नेण्यावर आणि राजनैतिक संबंध मजबूत करण्यावर दोघांमध्ये चर्चा झाली. याशिवाय, २०२४ मध्ये ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे झालेल्या G20 शिखर परिषदेदरम्यानही दोन्ही नेत्यांची भेट झाली होती.