अकोट : तालुक्यातील बळेगाव येथील आकाश नारायण भलावी (२५) याने एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवून नेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अकोट ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात येऊन आरोपीस अटक करण्यात आली आहे. २४ जानेवारी रोजी अकोट येथील अतिरिक्त जिल्हा व विशेष सत्र न्यायाधीश बी.एम. पाटील यांनी आरोपीला २७ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
या प्रकरणात अल्पवयीन पीडितेच्या बहिणीने ग्रामीण पोलिस स्टेशनला ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी लेखी फिर्याद दिली होती. त्यावरून अकोट ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक शिवानंद वीर यांनी ३ जानेवारी रोजी आरोपी आकाश भलावी यास अटक केली. आरोपीला पोलिस कोठडीमध्ये पाठविण्याबाबतचा रिमांड सरकारतर्पेâ सरकारी वकील अजित देशमुख यांनी अकोट सत्र न्यायालयात दाखल केला. त्यामध्ये म्हटले की, आरोपी आकाशने अल्पवयीन पीडितेला तिच्या पालकांच्या कायदेशीर रखवालीतून कोल्हापूर येथे पळवून नेवून झोपडीमध्ये तिच्यासोबत एकत्र राहून पीडितेवर दररोज जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. त्यामुळे पीडिता गभर्वती झाली आहे. सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून आरोपीची वैद्यकिय तपासणी करणे बाकी आहे. अल्पवयीन पीडित व आरोपीचे डीएनए सॅम्पल घेणे बाकी आहे. त्यामुळे आरोपीला पोलिस कोठडी द्यावी. दोन्ही पक्षाच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने आरोपी आकाश भलावी याची २७ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्याचा आदेश पारित केला आहे. (ता.प्र.)
अल्पवयीन मुलीस पळवून नेत अत्याचार करणार्यास पोलिस कोठडी
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)
Watch Live | Source Article