Published on
:
25 Jan 2025, 12:15 am
Updated on
:
25 Jan 2025, 12:15 am
सातारा : महिला वर्गाच्या आपुलकी जिव्हाळ्याचा सण म्हणजे मकरसंक्रात होय. हा सण आणखी खास करण्यासाठी दै. पुढारी कस्तुरी क्लबतर्फे गुरुवार दि.30 जानेवारी रोजी दुपारी 2 ते 5 या कालावधीत कला व वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदान येथे मकर संक्रांत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी महिलांच्या मनोरंजनासाठी डान्स, गंमतीशीर खेळ आणि हळदीकुंकू समारंभातून वाण लुटले जाणार असून लकी ड्रॉव्दारे भरपूर बक्षीसे जिंकण्याची संधी महिलांना मिळणार आहे.
पारंपारिक सणांना आधुनिकतेची झालर चढली असली तरी अजूनही स्त्रियांना अनेक पारंपारिक सणांचे महत्व कायम आहे. त्यापैकी एक मकर संक्रात असल्याने हळदी कुंकू व वाण वाटप अशा धाटणीच्या या उत्सवाचे महत्व महिलांमध्ये आजही आबाधित आहे. दररोजच्या धावपळीच्या युगात महिलांमधील सुप्त कलागुणांना वाव देवून थोडेसे मनोरंजन व्हावे. यासाठी विविध फनी गेम्स घेतले जाणार आहेत. यामधील विजेत्यांना आकर्षक बक्षीसे दिली जाणार आहेत. तसेच कार्यक्रमात सहभागी सर्व महिलांना तनिष फॉर्मिंग ज्वेलरीचे शुभम कदम यांच्याकडून महिलांना वाण व फनी गेम्सच्या विजेत्यांना बक्षीसे दिली जाणार आहेत.
या कार्यक्रमात लकी ड्रॉ काढले जाणार असून लकी ड्रॉ स्पॉन्सर नेल अॅण्ड मेकअप आर्टिस्ट आरती रजपूत या आहेत. कला व वाणिज्य महाविद्यालयाचे जयेंद्र चव्हाण हे वेन्यू पार्टनर आहेत. सोहळ्यात सहभागी होण्यासाठी कलर थीम आहे. कस्तुरींनी काळ्या रंगाच्या साड्या परिधान करुन साजशृंगारासह उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी 9172840739 वर संपर्क साधावा, असे आवाहन दै. पुढारी कस्तुरी क्लबतर्फे करण्यात येते.