Published on
:
25 Jan 2025, 12:06 am
Updated on
:
25 Jan 2025, 12:06 am
वैद्यकीय क्षेत्र, अवकाश संशोधन क्षेत्र, संगणक क्षेत्र यांसह सर्वच क्षेत्रांत अलीकडील काळात वेगाने वैज्ञानिक प्रगती होत आहे. यातून भविष्यात मोठी क्रांती घडून येणार आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात होणार्या जागतिक बदलाच्या पार्श्वभूमीवर सामूहिक तोडगा काढणे, दूरद़ृष्टीने आखले जाणारे धोरण आणि सरकार यांच्यात चांगला ताळमेळ असण्याबरोबरच नवकल्पनांना प्रोत्साहन मिळत असल्याने आपण केवळ वेगाने वाटचाल करत नाही आहोत, तर या आघाडीवर एक प्रकारची नेतृत्वक्षमता विकसित करत आहोत.
सध्या ज्ञान-विज्ञानातील प्रगती थक्क करणारी आहे. पापणी लवण्याच्या आत आश्चर्यकारकपणे होणार्या शास्त्रीय आणि तंत्रज्ञानाच्या बदलाच्या काळात आपली वाटचाल होत आहे. आपल्याकडे चॅट जीपीटीसारखा एआय पुरस्कृत सहकारी असून तो मिळणार्या संकेतानुसार कठीण प्रश्नांचे उत्तर देखील काही क्षणांत देतो. एवढेच नाही, तर एआयच्या उपलब्धतेमुळे दैनंदिन कामात सहजता आली आहे. आजाराचे निदान आणि उपचारांतील ‘एमआरएनए व्हॅक्सीन’मुळे आरोग्य सेवा क्षेत्रात व्यापक बदल झाला आहे. एकीकडे आपण जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या मदतीने आकाशगंगेतील रहस्य शोधून काढत असताना दुसरीकडे क्वांटम कॉम्प्युटिंगसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर आरोग्य उपचार आणि हवामान बदलासारख्या क्षेत्रात यशाची हमी बाळगत आहोत.
‘सीआरआयएसपीआर’ जीन एडिटिंग टूलने जुनाट आजारपणाच्या उपचारांसंदर्भात रुग्णांना आशेचा किरण दाखविला आहे. कृत्रिम प्रकाशसंश्लेषणसारख्या नवकल्पनांतून स्वच्छ ऊर्जा स्रोतांकडे वाटचाल होत आहे. अशा प्रकारच्या जागतिक बदलाच्या पार्श्वभूमीवर सामूहिक तोडगा काढणे, दूरद़ृष्टीने आखले जाणारे धोरण आणि सरकार यांच्यात चांगला ताळमेळ असण्याबरोबरच नवकल्पनांना प्रोत्साहन मिळत असल्याने आपण केवळ वेगाने वाटचाल करत नाही आहोत, तर या आघाडीवर एक प्रकारची नेतृत्वक्षमता विकसित करत आहोत. भारताचे बायो ई-3 धोरण हे बायोएआय हब, बायो फौंड्री आणि बायोमॅन्यूफॅक्चरिंग हबसारख्या उच्च प्रतीच्या सुविधांच्या माध्यमातून जैवतंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठा बदल आणून जैवशास्त्र उद्योगाचा मार्ग प्रशस्त करत आहे. यात औषधे, जैवइंधन, हवामान बदलास अनुकूल असणारे पीक, बायोप्लास्टिक्स तसेच बायोसिमेंटसारखे उत्पादन घेणे शक्य आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताच्या प्रगतीचे चांगले उदाहरण अवकाश कार्यक्रमाचे आहे. या कार्यक्रमाने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. चांद्रयान मोहीम-3 च्या यशाने भारताने चंद्राच्या स्थितीच्या विश्लेषणात आघाडी घेतली आहे. महत्त्वाकांक्षी गगनयान योजनेचा उद्देश भारतीय अंतराळवीरांना अवकाशात पाठविण्याचा आहे. या माध्यमातून शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांच्या नव्या पिढीला प्रेरणा मिळेल. एकीकडे ‘इस्रो’ने उपग्रह प्रक्षेपित केल्याने दळणवळण, हवामानाचा अंदाज आणि कृषी योजनांत क्रांतिकारी बदल घडवून आणला जात आहे. दुसरीकडे खासगी कंपन्यादेखील नवसंशोधन क्षेत्रात सरकारच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. त्यामुळे अवकाश तंत्रज्ञानात सुलभता येत असून एकप्रकारे भारताच्या अवकाश अर्थव्यवस्थेलाही चालना मिळत आहे.
क्वांटम कॉम्प्युटिंग, दळणवळण, दूरसंचार केंद्रित राष्ट्रीय क्वाँटम मिशन (एनक्यूएम) हे एक क्रांतिकारी पाऊल मानले जात आहे. त्याच्या व्यावहारिक लाभांत नवनवीन औषधे शोधण्यात वेग वाढविणे, ऑनलाईन व्यवहार निश्चित करणे, लष्करी हालचाली सुरक्षितपणे तडीस नेणे तसेच ऊर्जा दक्षतेत सुधारणा आणणे याचा समावेश आहे. खोल समुद्रात सक्रिय वाहन ‘मत्स्य- 6000’मुळे भारताची डीप ओशन मोहीमही सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. अशा प्रकारचे अत्याधुनिक वाहन खोल समुद्रातील रहस्यांसाठी संशोधन करणे, नवीन सागरी जीवांचा शोध लावणे, अमूल्य स्रोत शोधण्यासाठी समुद्रात हजारो मीटर खोलवर जाण्यास सक्षम आहे. हे वाहन सागरी संपदेचा सांभाळ करण्यात, रोजगारनिर्मिती, शाश्वत विकास निश्चित करण्यात आणि ब्लू इकॉनॉमीला सक्षम करणारे आहे.