अपघात ठार झालेले भागीनाथ जाधव, अपघातग्रस्त दुचाकी Pudhari Photo
Published on
:
24 Jan 2025, 12:56 pm
Updated on
:
24 Jan 2025, 12:56 pm
हतनूर (प्रतिनिधी) : अज्ञात वाहनाच्या धडकेत एका इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना कन्नड तालुक्यातील पाणपोई फाटा येथील बहीरगाव फाटयाजवळ जवळ घडली. हतनूर येथून कन्नड कडे हा इसम दुचाकीने येत होता अशी माहिती आहे. ही घटना २४ जानेवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. भागीनाथ धोंडीबा जाधव रा.हतनूर ता.कन्नड असे अपघातात मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे.
भागीनाथ धोंडीबा जाधव हे एम एच-२०-ए एल ४२४८ क्रमांकाच्या दुचाकीने कन्नडला काही कामासाठी चालले होते. मात्र सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील पाणपोई फाटा येथील बहीरगाव फाट्यजवळ आल्यानंतर अज्ञात वाहनाने भागीनाथ जाधव यांच्या दुचाकी ला जोरदार धडक मारली यात त्यांना गंभीर मार लागल्याने यानंतर कन्नड येथील दवाखान्यात येथे उपचारासाठी घेऊन गेले. परंतु, पुढील उपचाराकरीता ग्रामीण रुग्णालय पाठविण्यात आले. उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. कन्नड ग्रामीण पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.