90 च्या दशकात आपल्या अभिनयाने व सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री ममता कुलकर्णी हिने संन्यास घेतला आहे. ममता कुलकर्णी ही किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनणार आहे. त्यासाठी ममता प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभला पोहोचली आहे. तिथले साध्वीच्या वेशातील तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
ममता कुलकर्णीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओ ती साध्वीच्या वेशात दिसत आहेत. भगवे वस्त्र तिने घातले आहे, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा आहेत.