कडोळीत वीज वाहिनीवर आकडा टाकून वीज चोरी:20 जणांवर सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

5 hours ago 1
सेनगाव तालुक्यातील कडोळी येथे महावितरणच्या लघुदाब वीज वाहिनीवर आकोडे टाकून वीज चोरी करणाऱ्या 20 जणांवर सेनगाव पोलिस ठाण्यात गुरुवारी ता. 23 रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. सेनगाव तालुक्यातील काही गावांमधून मागील काही दिवसांत महावितरणाच्या लघुदाब वीज वाहिनीवर आकोडे टाकून वीज चोरी करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. या संदर्भात वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी तपासणी मोहिम हाती घेतल्यानंतर सदर प्रकार उघडकीस येऊ लागले आहेत. विशेष म्हणजे या गावकऱ्यांना वीज वापरल्याचे देयक दिल्यानंतरही त्यांच्याकडून देयक भरले जात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे वीज गळती सोबतच कमी दाबाने वीज पुरवठा होण्याचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान, वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता सत्यनारायण वडगावकर यांच्या पथकाने काही दिवसांपुर्वीच कडोळी या गावात जाऊन पाहणी केली. यामध्ये तब्बल 20 गावकरी महावितरणच्या लघुदाब वीज वाहिनीवर आकोडा टाकून वीज वापरत असल्याचे आढळूुन आले. त्यानंतर या गावकऱ्यांना वीज देयक व दंडाची रक्कम भरण्याबाबत नोटीस देण्यात आली. मात्र त्यांनी रक्कमेचा भरणा केलाच नाही. याप्रकारानंतर सहाय्यक अभियंता वडगावकर यांनी गुरुवारी ता. 23 सेनगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी वीजय इंगळे, नागनाथ वैराट, विश्‍वास हमाने, संतोष देशमुख, लता रेडगे, माधव टोंचर, मिलींद इंगोले, संदीप इंगोले, संतोष सुधाकर देशमुख, ज्ञानेश्‍वर कांबळे, शामसुंदर इंगळे, सुर्यभान इंगोले, अशोक वाघमारे, मनोज देशमुख, सुनीता वांगने, समाधान हमाने, मारोती दिनकर, दशरथ कातडे, विकास जिंतलवाद, केशव भांबाडे (रा. कडोळी) यांच्या विरुध्द वीज चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक मोहन भोसले पुढील तपास करीत आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article