वक्फ बोर्ड JPC बैठकीत तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी आणि भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्यात जोरदार वादावादी झाली. ANI X Photo
Published on
:
24 Jan 2025, 8:07 am
Updated on
:
24 Jan 2025, 8:07 am
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : वक्फ बोर्ड विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीत आज (दि. २४) राडा झाला. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंतांसह १० विरोधी पक्षाच्या खासदारांचे समितीच्या सदस्य पदावरून निलंबन करण्यात आले आहे. तर ही बैठक २७ जानेवारीपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.
या बैठकीत तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी आणि भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्यात जोरदार वादावादी झाली. परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याचे पाहून १० खासदारांचे समितीच्या सदस्य पदावरून निलंबन करण्यात आले.
बैठकीत झालेल्या गोंधळानंतर, वक्फ दुरुस्ती विधेयक २०२४ वरील संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीतून सर्व १० विरोधी खासदारांना दिवसभरासाठी निलंबित करण्यात आले आहे. निलंबित करण्यात आलेल्या विरोधी खासदारांमध्ये कल्याण बॅनर्जी, मोहम्मद जावेद, ए राजा, असदुद्दीन ओवैसी, नासिर हुसेन, मोहिबुल्लाह, एम. अब्दुल्ला, अरविंद सावंत, नदीमुल हक, इम्रान मसूद यांचा समावेश आहे.
Following a ruckus in the meeting, all 10 Opposition MPs suspended for the day from the meeting of the Joint Parliamentary Committee on Waqf Amendment Bill 2024
The suspended Opposition MPs include Kalyan Banerjee, Md. Jawaid, A Raja, Asaduddin Owaisi, Nasir Hussain, Mohibullah,…
— ANI (@ANI) January 24, 2025