Parbhani :- संपूर्ण परभणी जिल्ह्याचा कारभार हाकणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयच वाहनांच्या गराड्यात या मथळ्याखाली दैनिक देशोन्नतीने गुरुवार २३ जानेवारी रोजी वृत्त प्रकाशित करताच कार्यालयाच्या आवारात पार्किंग (Parking) मध्ये मोठ्या प्रमाणावर बदल झालेला दिसून आला.पार्किंग व्यवस्थे करिता तेथे कर्मचाऱ्यांची नेमणूक ही दिसून आली. तसेच तहसील समोर
– नो- पार्किंग फलका सह बॅरिकेट्स ही लावल्याचे शुक्रवार २४ जानेवारी रोजी पाहण्यास मिळाले.
तहसील समोर लागले ब्रॅरीकेट्स; पार्किंग व्यवस्थेकरिता कर्मचाऱ्यांची नेमणूक
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात नेहमीच होणाऱ्या बेशिस्त पार्किंग मुळे चक्क जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार यांच्या प्रवेशद्वारापर्यंत बेशिस्तपणे वाहनधारक दुजाकीची पार्किंग करत होते. याबाबत दैनिक देशोन्नतीने गुरुवार २३ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय वाहनाच्या गराड्यात बेशिस्त पार्किंग. या मधल्या खाली वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची खुद्द जिल्हाधिकारी व तहसीलदार यांनी दखल घेत या ठिकाणी बाहेरून येणाऱ्या व कर्मचाऱ्यांच्या दुचाकींच्या पार्किंग करिता स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. तसेच तहसीलच्या कार्यालयासमोर बॅरिकेट्स ही लावण्याचे दिसून आले.