आदित्य ठाकरे बालिश राजकारणी, त्यांना सरकारचा गाभा कळाला नाही:उद्धव ठाकरेंना शरद पवार अन् काँग्रेसने सोडून दिले- चंद्रशेखर बावनकुळे
3 hours ago
2
आदित्य ठाकरे बालिश राजकारणी आहे. त्यांच्याकडे पर्यटन खाते होते तेव्हा त्यांनी केवळ पर्यटन केले, त्यांना सरकारचा गाभा कळाला नाही. दावोसमध्ये सर्व उद्योजक येत असतात तिथे करार होत असतात, असे म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे पुढे बोलताना म्हणाले की, आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करायला हवे. त्यांनी 17.75 लाख कोटी रुपये गुंतवणूक महाराष्ट्रात आणली आहे. पण बिघडलेल्या मानसिकतेमधील कारट्यांना काही सुधरत नाहीये, असे म्हणत आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र थांबणार नाही, तो विकसित होणार आहे. गडचिरोली ते बुलडाणापर्यंत शेती असो की औद्योगिक क्षेत्र असो विदर्भांचे मागासले पण हे आता दूर होणार आहे. उद्धव ठाकरे हे हम दो अन् हमारे दो राहतील चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरेंना शरद पवार आणि काँग्रेसने सोडून दिले आहे. त्यामुळे स्वबळाशिवाय दुसरा मार्ग नाही. आता त्यांना सर्वच जण सोडून देत आहे. एक दिवस असा येईल की उद्धव ठाकरे हे हम दो अन् हमारे दो राहतील. सत्तेसाठी येणाऱ्यांना प्रवेश नाही केवळ सत्तेसाठी सत्ताधारी पक्षांसोबत येणाऱ्या नेत्यांना महायुतीत थेट प्रवेश दिला जाणार नसल्याची स्पष्टोक्ती भाजप प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी दिली आहे. त्यांच्या या विधानामुळे महायुतीसोबत जाण्याची मनिषा बाळगणाऱ्या महाविकास आघाडीतील नेत्यांना जबर झटका बसला आहे. तर सैफ अली खान याच्यावर हल्ला झाल्यानंतर लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले होते. डॉक्टरांनी केलेल्या उपचारावर शंका घेण्याची आवश्यकता नसल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. मोठ्या जिल्ह्यांत 2 अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालये महसूल प्रशासन अधिक गतिमान व्हावे यासाठी राज्यातील सर्व मोठया जिल्ह्यांत संपूर्ण आस्थापनेसह दोन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालये निर्माण करण्यासाठी तातडीने प्रस्ताव तयार करा, अशी स्पष्ट सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील सर्व विभागीय महसूल आयुक्तांनी दिल्या.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)