लाेकसभा, विधानसभा निवडणुकीत बिटकाॅइनचा मोठ्या प्रमाणात वापर:माजी आयपीएस अधिकारी रवींद्र पाटील दाखल करणार याचिका
11 hours ago
1
बिटकाॅइन प्रकरणातील बिटकाॅइनचा वापर राज्यातील लाेकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी करण्यात आला आहे. याबाबत मी काही माहिती माध्यमांना दिली आहे. सदर ऑडिओदेखील देण्यात आले आहे. निवडणूक आयोगास सर्व माहिती देऊन तक्रार केली. हा गंभीर गुन्हा असून निवडणुकीसाठी हवाला पैसा वापर हाेत आहे. आपल्याकडे खा. सुप्रिया सुळे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधातील सर्व पुरावे असून उच्च न्यायालयातदेखील मी याबाबत रिट पिटिशन दाखल करणार आहे. सीबीआय तपास या प्रकरणाचा झाला पाहिजे, असे मत माजी आयपीएस अधिकारी व बिटकाॅइन गुन्ह्यात जामिनावर असलेले रवींद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. पाटील म्हणाले, १७ नाेव्हेंबर राेजी सायंकाळी साडेपाच वाजता माझ्या माेबाइलवर सिग्नल अॅपवर मला काही अनाेळखी नंबरचे मिसकॉल दिसले. मी त्याची खातरजमा केली असता संबंधित क्रमांक हे गाैरव मेहता नावाच्या व्यक्तीचे हाेते. हा ताेच व्यक्ती आहे, जाे सारथ असाेसिएट्स फॉरेन्सिक ऑडिटचा असून ज्याने माझ्याविराेधात ऑडिट रिपोर्ट दिला हाेता की, बिटकाॅइन घाेटाळा झालेला आहे. मी त्याला सुरुवातीला दुर्लक्षित केले, परंतु त्याने माझ्याशी बाेलण्याचा प्रयत्न केल्यावर मी त्याच्याशी चॅटिंग केली. सन २०१८ मध्ये बिटकाॅइन एक वाॅलेट चाेरीस गेले हाेते व त्यानंतर पुण्याचे पाेलिस आयुक्त अमिताभ गुप्ता आले हाेते. त्यांनी दुसऱ्या बिटकाॅइन वाॅलेट जागी त्याला बदलले. त्याचा वापर करून गुप्ता व आयपीएस भाग्यश्री नवटक्के यांनी फायदा मिळवला. २०२४ च्या लाेकसभा निवडणुकीत हे बिटकाॅइन विक्री करून त्याचे पैसे हवालामार्फत निवडणुकीसाठी वापरला गेल्याचे ते म्हणाले. बिटकाॅइन घाेटाळा चाैकशी गरजेची : केंद्रीय मंत्री माेहाेळ बिटकाॅइन घाेटाळा गंभीर असून त्याची सत्यता तपासली पाहिजे. माजी आयपीएस अधिकारी रवींद्र पाटील यांनी केलेल्या आराेपाची चाैकशी हाेणे गरजेचे आहे. हा गुन्हा सिद्ध झाल्यास महाराष्ट्रातील सर्वात माेठा घाेटाळा हा असेल. जे भ्रष्टाचारावर बाेलतात व समाेरच्याला शिकवतात त्या वेळी आपणास ती नैतिकता हाेती का? याबाबत विचार करणे गरजेचे आहे, असे मत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले आहे. आरोप करणारे एक वर्ष कारागृहात राहिले : शरद पवार खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर बिटकाॅइन घाेटाळ्याबाबत आराेप झाले त्यासंदर्भात पवार म्हणाले, ज्या माजी आयपीएस अधिकारी व बिटकाॅइन घाेटाळयातील आराेपीने हे आराेप केले ते एक वर्ष कारागृहात राहून आले आहेत. त्याची नाेंद घेणे गरजेचे नाही. भाजप व त्यांचा प्रचार हा किती खालच्या पातळीवर गेलेला आहे हे यातून दिसून येत आहे. तो आवाज बहिणीचा : अजित पवार सुप्रिया सुळेंच्या कथित ऑडिओ क्लिपबद्दल प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, या ऑडिओ क्लिपमध्ये ज्या दोन लोकांचे आवाज ऐकू येत आहेत. त्यांना मी ओळखतो. एक आवाज माझ्या बहिणीचा आहे, तर दुसरा आवाज विधानसभेतील माझ्या एका सहकाऱ्याचा आहे. आता तो सहकारी त्यांच्यासोबत आहे. सुप्रिया सुळे, पटोले यांचे संभाषण खासदार सुप्रिया सुळे व काँग्रेस नेते नाना पटाेले यांच्या माध्यमातून हा प्रकार घडल्याचे सांगितले. मात्र, मला हा सापळा वाटल्याने मी सावध भूमिका घेतली. मला या भानगडीत पडायचे नाही त्यानंतर मेहता याने मला काही ऑडिआे क्लिप पाठवल्या. त्या वेळी माझ्या पायाखालील जमीन सरकली. दाेन आयपीएस, दाेन राजकीय व्यक्ती व एक गाैरव मेहता यांचा ऑडिआे आहे. ही ऑडिआे क्लिप बनावट नसून खरी असल्याचे त्यातील आवाजावरून स्पष्ट झाले. त्यात सुळे सांगत हाेत्या की, सध्या बिटकाॅइनचा रेट चांगला आहे. निवडणूक आल्या असून तुम्ही बिटकाॅइन विका व त्याचा पैसा निवडणुकीत वापरा. याची चाैकशी हाेण्याची भीती बाळगू नका. आम्ही सत्तेत आल्यावर सगळे सांभाळू. नाना पटाेले हे अमिताभ गुप्ता यांच्याशी बाेलणे करताना सांगतात की, अद्याप पैसे आले नाहीत, पैसे पाठवा. ५० काेटी पाहिजे असे ते स्पष्ट सांगतात, असेही त्यांनी सांगितले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)