लेबनॉनमध्ये इस्रायलचा आम्‍ही पराभव केला, हिजबुल्‍लाहचा म्‍होरक्‍या कासिमचा दावा

2 hours ago 1

लेबनॉनमध्ये इस्रायलला आम्‍ही झुकवले, हिजबुल्‍लाहचा म्‍होरक्‍या कासिमचा दावा(Images source- X)

Published on

30 Nov 2024, 5:31 am

Updated on

30 Nov 2024, 5:31 am

बेरूत : पुढारी ऑनलाईन

बेरूत : लेबनानी गट हिजबुल्लाहचा प्रमुख नइम कासिम यांनी इस्रायलविरुद्ध मोठा विजय मिळवल्याचे म्हटले आहे. शुक्रवारी एका टीव्हीवरील भाषणात, कासिमने लेबनॉनमधील अलीकडील युद्धात इस्रायलला झुकण्यास भाग पाडल्याचा दावा केला आहे. कासिम म्हणाला की, हिजबुल्लाच्या सततच्या प्रतिकारामुळे इस्रायलला गुडघे टेकले आणि तडजोड करण्यास भाग पाडले. हिजबुल्लाहने 2006 नंतर लेबनॉनमध्ये पुन्हा एकदा इस्रायलचा पराभव केला आहे.

यरूशमल पोस्‍टच्या अहवालानुसार, कासिमने सप्टेंबरमधील पेजर हल्ल्याचा संदर्भ देत कासिम म्हणाला की, इस्रायलला हिजबुल्लाहच्या कमांड सिस्टमवर हल्ला करून आपले लक्ष्य साध्य करण्याची आशा होती. मात्र असे घडले नाही आणि हिजबुल्लाहने इस्रायलच्या होम फ्रंटवर हल्ले सुरू केले, इस्रायलला बचावात्मक स्थितीत ठेवले आणि युद्धविराम झाला.

आम्‍ही घाबरून समझोता केला नाही : कासिम

या दरम्‍यान कासिमने सांगितले की, आम्‍ही आमची मान उंचाउन हा करार केला आहे. लितानी नदीच्या खाली दक्षिण लेबनॉनच्या सर्व भागांतून इस्रायली सैन्याची माघार हा या कराराचा मुख्य मुद्दा होता. आम्ही त्यास चिकटून राहिलो आणि इस्रायलला ते मान्य करावे लागले. त्यांनी हिजबुल्लाह कमकुवत होईल अशी व्यवस्‍था लावली होती पण त्यांचा डाव पूर्णपणे फसला आहे.

कासिमने आपल्‍या भाषणात म्‍हंटलंय की, आमचा हा २००६ पेक्षाही मोठा विजय झाला आहे. इस्रायलच्या पराभवाचे एक लक्षण म्हणजे आमच्या लोकांची माघार आणि दुसऱ्या बाजूला स्थायिकांची अनुपस्थिती. युद्धविराम व्यवस्थेवर चर्चा करताना, कासेम म्हणाला की, कराराची अंमलबजावणी करण्यासाठी लेबनीज सैन्य आणि हिजबुल्ला यांच्यात उच्चस्तरीय समन्वय असेल. या काळात सतत लढत राहिल्याबद्दल कासिमने हिजबुल्लाचे कौतुक केले आहे.

इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात करार झाला

इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात या आठवड्यात युद्धविराम करार झाला आहे. अमेरिकेच्या मध्यस्थीने झालेल्या या करारानुसार इस्त्रायली सैन्य दक्षिण लेबनॉनमधून माघार घेतील आणि हिजबुल्लाही तेथून माघार घेईल. इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये गेल्या 13 महिन्यांपासून वाद सुरू आहेत. हा तणाव गेल्या दोन महिन्यांत वाढला, जेव्हा इस्रायलने लेबनॉनवर बॉम्बफेक सुरू केली. यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article