वाचक हा प्रयत्नपूर्वक घडवावा लागतो:मंगळवेढा वाचनालयात वाचन प्रेरणा दिन

8 hours ago 1
वाचन संस्कृती विकसित करण्यासाठी आपणाला प्रथमतः घरापासून सुरुवात करावी लागेल. त्यासाठी पालकांनी आपल्या पाल्यांना वाचनाची आवड लावण्यासाठी वाढदिवसांना पुस्तक भेट देणे, साहित्य विषयक कार्यक्रमांना आवर्जून घेऊन जाणे, स्वतः पुस्तकांचा छोटासा संग्रह करणे, स्वतः वाचन करणे, त्याचबरोबर शालेय स्तरातून शिक्षकांनी स्वतः वाचनाचा संस्कार मुलांवरती होईल या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत तरच खऱ्या अर्थाने वाचक निर्माण होतील असे प्रतिपादन डॉ. दत्ता सरगर यांनी केले. सव्वाशे वर्षाहून जास्त जुन्या असलेल्या मंगळवेढा नगर वाचनालयात भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस १५ऑक्टोबर हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला, त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नगर वाचनालयाचे सचिव रामभाऊ कुलकर्णी होते. अकबर मुलाणी म्हणाले, कोणत्याही माणसाची आणि शहराची उंची ही तेथील इमारतीवरून न ठरवता माणसाच्या कर्तृत्वावरून आणि तेथे असलेल्या ग्रंथालयावरून ठरवायला हवी. माणसाचे कर्तृत्व घडवण्यासाठी ग्रंथालय अत्यंत आवश्यक असतात. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रामध्ये , हेमंतराव रत्नपारखी, हरिभाऊ देवकर,विद्या माने यांनी विविध विषयांवर आपल्या कविता सादर केल्या. उपस्थितांची दाद मिळवली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रंथपाल ज्ञानेश्वर कुलकर्णी, गजानन वाकळे आणि चव्हाण यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या माने यांनी केले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article