वादग्रस्त वक्तव्याबाबत निवडणूक आयोग ॲक्शन मोडवर:अहवाल देण्याच्या सूचना; 'बटेंगे तो कटेंगे', जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांवर काय कारवाई होणार?
6 hours ago
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वादग्रस्त वक्तव्याचा अहवाल केंद्रीय निवडणूक आयोगाने मागवला आहे. यामध्ये महाराष्ट्र निवडणुकीच्या प्रचार दरम्यान केलेल्या वादग्रस्त विधानांचा समावेश करण्यात आला आहे. सामाजिक किंवा धार्मिक भावना भडकवणाऱ्या विधानांचा अहवाल देखील केंद्रीय निवडणूक आयोगाने मागवला आहे. आगामी पंधरा दिवसात अहवाल देण्याच्या सूचना राज्यातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आतापर्यंत 15 अहवाल आधीच निवडणूक आयोगाला पाठवण्यात आले असल्याची माहिती देखील सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता या अहवालावर आयोग काय निर्णय घेणार? आणि वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या व्यक्तींवर काय कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. महाराष्ट्रामध्ये प्रचारादरम्यान 'बटेंगे तो कटेंगे' अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या होत्या. भाजपच्या नेत्यांच्या या घोषणेवर काँग्रेसच्या वतीने आधीच आक्षेप घेण्यात आला होता. तसेच नाशिक मधील एका उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी देखील यादरम्यान देण्यात आली होती. यासोबतच इतर अनेक महत्त्वाच्या घटना घडामोडी घडल्या आहेत. यात पैशांचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्याच्या देखील घटना समोर आल्या. त्यामुळे या सर्व घटना घडामोडी बाबत निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे. उद्याच्या निकालानंतर चित्र स्पष्ट महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. त्यानंतर आता 23 तारखेला या निवडणुकीचा निकाल समोर येणार आहे. उद्या येणाऱ्या निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कोणाचे सरकार येणार, याविषयी चांगलीच चर्चा रंगली आहे. सर्वच मीडिया संस्थांनी आपापले एक्झिट पोल देखील जाहीर केले आहेत. मात्र, याविषयी अजूनही साशंकता व्यक्त केली जात आहे. महाविकास आघाडी असो किंवा महायुती, दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून आमचेच सरकार येणार असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, यासंबंधीचे चित्र उद्याच्या निकालानंतरच स्पष्ट होईल. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा.... महायुतीचे उमेदवारांना 50-100 कोटींचे आमिष:संजय राऊत यांचा मोठा आरोप; म्हणाले - जिंकण्याची खात्री नसते तेच लोक पैसे देतात राज्यामध्ये महाविकास आघाडी किमान 160 जागा जिंकणार असल्याचा दावा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. काल आम्ही प्रत्येक मतदारसंघ निहाय आढावा घेतला. त्यानुसार आम्ही किमान 160 जागा जिंकत असल्याचे लक्षात आले, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे 'सर्व्हेची ऐसी की तैसी' असे म्हणत संजय राऊत यांनी एक्झिट पोल मधील केलेले सर्व दावे फेटाळले आहेत. पूर्ण बातमी वाचा.... निकालाआधीच प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा:सत्ता स्थापन करणाऱ्या पक्षाला पाठिंबा देणार; वंचित बहुजन आघाडीने भूमिका केली स्पष्ट वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सत्ता स्थापनेबाबत मोठा दावा केला आहे. उद्या लागणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर वंचित बहुजन आघाडीला सत्ता स्थापन करण्यासाठी सत्ता स्थापन करणाऱ्या पक्षाला किंवा युतीला पाठिंबा देण्याची वेळ आली तर आम्ही त्यांच्या सोबत जाणे पसंत करणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. पूर्ण बातमी वाचा.... काँग्रेस नेते नसीम खान यांच्या सुरक्षेत वाढ:कार्यालयात आढळलेल्या दोन संशयितांच्या मोबाईल मध्ये आक्षेपार्ह चॅट; मुंबई पोलिस अलर्टवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नसीम खान यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यांच्या कार्यालयात दोन संशयित आढळून आल्याने पोलिस अलर्ट मोडवर आले असून सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. ज्या दोन संशयतांना ताब्यात घेण्यात आले, त्या दोन संशयतांच्या मोबाईल मध्ये काही आक्षेपार्ह चॅट देखील खान यांच्या संबंधित आढळून आले. त्यामुळे या सर्व प्रकरणाकडे पोलिस प्रशासन गांभीर्याने पाहत आहे. पूर्ण बातमी वाचा...
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)