वारंवार हात धुण्याची सवय अंगी बाळगावी:निरोगी आरोग्यासाठी तज्ज्ञांचे आवाहन, हात कसे व केव्हा धुवावेत?‎

3 days ago 3
पूर्वी अनेकजण बाहेरून आल्यानंतर हात पाय न धुता घरात तसेच वावरत होते. मात्र, कोरोनामुळे अनेकांच्या जीवनात तसेच स्वच्छतेच्या सवयींमध्ये बदल झाला आहे. महामारीच्या या काळात अनेकांना हात धुण्याचे महत्त्व कळले. सर्दी, खोकला यासह संसर्गजन्य आजारांना प्रतिबंध करण्यासाठी वारंवार हात धुणे अतिशय आवश्यक असून, तो आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनवा, असे आवाहन जागतिक हात धुवा दिवसाच्या निमित्ताने तज्ज्ञांनी केले. अनेक जण बाहेरून आल्यानंतर हात न धुताच घरात वावरत होते. मोठ्यांचे हेच अनुकरण लहान करत होते. परंतु, कोरोनामुळे आरोग्यासाठी हात धुणे किती महत्त्वाचे आहे, हा धडा मानव जातीने घेतला असून अनेकांच्या जीवनात हा सकारात्मक बदल झाल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. प्रत्येकाने हात स्वच्छ धुण्याची सवय अंगी बाळगावी. त्यामुळे किटाणूंपासून आपले संरक्षण होऊन आजारदेखील होणार नाहीत. बहुतेक संसर्गजन्य आजारांचा फैलाव हा हातांद्वारे होते. आरोग्य अबाधित राखण्यास हात नेहमी स्वच्छ ठेवण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले. हात कसे धुवावेत? {पाण्याने हात ओले करून त्याला साबण किंवा हँड वॉश लावावे. {दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर व्यवस्थित घासावे. {बोटे एकमेकांत अडकवून ती एकमेकांवर घासावी. {दोन्ही हातांची बोटे क्रमाक्रमाने हाताच्‍या तळव्‍यावर फिरवावी. {त्यानंतर भरपूर पाण्याने हात स्वच्छ करावेत. वेळोवेळी धुवावेत हात ^अस्वच्छ हात अनेक आजारांना निमंत्रण देतात. सर्दी, खोकला, डोळे येणे यासह अन्य संसर्गजन्य आजार टाळण्यासाठी, तसेच शरीराची काळजी घेण्यासाठी वेळोवेळी हात धुणे ही एक प्रभावी आणि महत्त्वाची बाब आहे. वारंवार हात धुणे ही क्रिया आजारी पडण्याचा धोका कमी करते. तसेच इतरांना आजार होण्यापासून अटकाव करते. त्यामुळे वेळोवेळी हात धुवावेत. -डॉ. श्रीनिकेत तिडके.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article