Walmik Karad successful ICU : संतोष देशमुख खून प्रकरण आणि खंडणी प्रकरणात चर्चेत असलेला आरोपी वाल्मिक कराड याला तातडीने आयसीयूमध्ये भरती करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या प्रकृतीच्या कुरबुरी सुरू होत्या. त्याला बीडमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वाल्मिक कराड
बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि खंडणी प्रकरणात मोक्का लावण्यात आलेला आरोपी वाल्मिक कराड यांची तब्येत अचानक खालावली. त्याला तातडीने पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. त्यानंतर त्याला अतिदक्षता विभागात, ICU मध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले. दरम्यान वाल्मिक याच्या जीवाला धोका असल्याचा आरोप करण्यात येत आहे. याप्रकरणात त्याला मारून टाकण्याचा धोका असल्याचा दावा करण्यात येत आहे.
बातमी अपडेट होत आहे…
हे सुद्धा वाचा