विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा घोळ कायम:दोन वर्ष आधीची आकडेवारी देण्यात आल्याने मिळाले ढगळ गणवेश

2 hours ago 1
जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना सरकारकडून मोफत गणवेश वाटप केले जाते. वर्षातून दोन गणवेश वाटप केले जातात. यातील नियमित गणवेशापैकी ३,५०२ गणवेशाचे वाटप अजून व्हायचे आहे. तर स्काऊटचे सर्वच्या सर्व म्हणजे ९२,२०५ गणवेश अजून शिवूनच व्हायचे असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यासाठी पहिल्या गणवेशासाठी पटसंख्या दोन वर्षा आधीची देण्यात आली. परिणामी पहिलीतील मुलगा तिसरीत गेला. गणवेश मात्र पहिलीचा मिळाला. या घोळामुळे अनेकांना गणवेश मापाचे मिळाले नाही. मात्र स्काऊटच्या विद्यार्थ्यांची ताजी आकडेवारी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना व्यवस्थित गणवेश मिळेल असे सूत्रांनी सांगितले. नागपूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १५७६ शाळा आहे. या शाळेतील ९२,२०५ विद्यार्थी गणवेशासाठी पात्र आहे. त्यापैकी सुमारे ८८ हजार ७०३ विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला अाहे. कारण पहिल्या नियमित गणवेशाचे कापड ठेकेदारानेच कापून पाठवले होते. महिला आर्थिक विकास महामंडळाला ते जोडण्याचे प्रति गणवेश ११० रूपये शिलाई देण्यात आली. मात्र स्काऊटच्या गणवेशाचे नुसते कापड आलेले आहे. ते विद्यार्थ्याच्या मापानुसार कापून गणवेश शिवून द्यायचा आहे. आणि त्याची शिलाई मात्र प्रति गणवेश १०० रूपयेच देणार असल्याने माविमने गणवेश शिवायला नकार दिला आहे. पहिल्या गणवेशासाठी कापून आलेल्या कापडापैकी काही गणवेशांचे कापड निकृष्ट दर्जाचे होते. ते बदलून देण्यासाठी सांगितले असल्याचे सूत्रांनी सांगितले. पूर्वी अधिकार शाळा व्यवस्थापन समितीकडे अधिकार होते. आता ते काढले. एक रंग, एक गणवेश असा नियम केला. गणवेशाचा कपडा शासनाकडून आला. महिला आर्थिक विकास मंडळाकडून शिवून घेण्यास सांगितले. एका गणवेशामागे १०० रूपये दिले. पूर्वी एकत्रित खरेदी होत असे. त्यात कोणी वंचित राहात नसे असे सूत्रांनी स्पष्ट केले. या गोंधळामुळे १५ ऑगस्ट स्वतंत्र्यदिनी या विद्यर्थ्यांना जुन्याच गणवेशात झेंडावंदन करण्याची नामुष्की ओढवली होती.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article